Mobile: मोबाइलवर बोलणे पडले महागात, वाहनधारकांकडून पाच महिन्यांत ५६ लाखांचा दंड वसूल

Mobile:वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.
Mobile
MobileSakal
Updated on

Avoid use of Mobile While Driving : वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये आर्थिक शिक्षेसह थेट परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. तरीदेखील काही जण वाहन चालविताना मोबाइलचा वापर करतात. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी सरकारने दंडाची रक्कम वाढविली आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळते. शहर वाहतूक पोलिसांनी पाच महिन्यांत मोबाइलवर बोलणाऱ्या ४ हजार ४४ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. जवळपास १७ लाखांपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावतात. वाहन चालविताना नियमांचे पालन झाले पाहिजे. मात्र, वाहनधारक नियम पाळत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहन चालविताना सर्वांनी नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिस कायद्याचा धाक दाखवितात. तरीदेखील वाहनधारकांना कायद्याची भीती नसल्याचे कारवाईतून दिसून येते.

काही दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक थेट मोबाइलचा वापर करतात. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. यामुळे नवीन केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू केला आहे. राज्यात लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार दुचाकीस्वार मोबाइलवर बोलत असेल, तर १ हजार रुपये आणि चारचाकी वाहनचालकांना २ हजारांचा दंड आकारला जातो; तसेच पुढील ३ वर्षांच्या कालावधीत दोनवेळा किंवा तिसऱ्यांदा गुन्हा झाला, तर थेट १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तरीदेखील वाहनधारकांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे कारवाईतून दिसून येते.

Mobile
Maharashtra Krishi Din 2024: मराठवाड्याच्या शेतीतील बलस्थानांना हवा आधार

अशी आहे दंडाची रक्कम

नवीन नियमानुसार दुचाकी चालवीत मोबाइलवर बोलताना आढळल्यास १ हजार रुपये दंड बसणार आहे. तर चारचाकी वाहनचालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुढील ३ वर्षांच्या कालावधीत दोनवेळा किंवा तिसऱ्यांदा गुन्हा झाला, तर थेट १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

अशी झाली कारवाई

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ४ हजार ४४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई १ जानेवारी ते ३१ मेदरम्यान करण्यात आली. नियम तोडणाऱ्या या वाहनधारकांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.