छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विलास औताडे यांना निवडून आणा, असे आवाहन तेलंगणाचे सिंचन मंत्री एन. उत्तमकुमार रेड्डी यांनी केले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी वरूड काजी येथे उत्तमकुमार रेड्डी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.