वैजापूर पोलिस हे महिलांचे रक्षक की भक्षक? चित्रा वाघ

आमदाराकडून महिलेला झालेल्या मारहाणप्रकरणी चित्रा वाघ यांचा आरोप
Vaijapur Police protector or predator of women Chitra Wagh
Vaijapur Police protector or predator of women Chitra Waghsakal
Updated on

वैजापूर :आमदार रमेश बोरनारे यांनी चुलत भावजयीला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी वैजापूर पोलिस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक, अशी टीका केली आहे. यासंदर्भात बुधवारी (ता.२३) त्यांनी वैजापुरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, बोरनारे प्रकरणात वैजापूर पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. सटाना येथील चुलत भावजयीने भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने शिवसेनेचे आमदार बोरनारे व इतर आठ ते दहा लोकांनी मिळून एका महिलेला भर रस्त्यावर लाथा बुक्क्यानी मारहाण केल्यानंतरही पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी त्या महिलेला पाच तास ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर ३५४ ब ३२६ विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता केवळ जामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळेच आमदार बोरणारे यांनी पोलिसांना हाताशी धरून घटनेनंतर फिर्यादी महिलेवर अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला व ज्यांनी आवाज उठवला त्या लोकांना आता जीवे मारण्याच्या धमक्या आमदार देत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी परिषदेत केला.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, डॉ.राजीव डोंगरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, गटनेता दशरथ बनकर, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, सुरेश राऊत, नगरसेविका जयमाला वाघ, कल्पना पवार आदींची उपस्थिती होती.

प्रजापती यांची भेट

बुधवारी चित्रा वाघ यांनी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत हजर होते. आरोपी विरोधात ३५४ ब ३२६ गुन्हे दाखल का केले नाही, असा जाब प्रजापती यांना विचारला. यावर या प्रकरणात त्यांनी अद्याप विनयभंगाची तक्रार दाखल केली नाही. यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे वैजापूर पोलिस ठाणेप्रमुखांनी सांगितले. यामुळे वाघ या संतप्त झाल्या होत्या. एका महिलेला भर रस्त्यावर आमदार व त्यांचे भाऊ मारहाण करतात व तुम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता साधे जामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली आणि तक्रार आलेली नाही असे पोलिस म्हणतात. पोलिस स्वतःहून दखल घेऊ शकत नाहीत का, कोणाच्या आदेशाची वाट बघत आहात, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित करुन पोलिस निरीक्षक राजपूत यांचे व आमदारांचे सिडीआर, व्हॉस्ट्सअप स्टेटस् तपासण्याची मागणी केली.

कर नाही, तर डर कशाला?

ईडीने आतापर्यंत ज्या कुणावर कारवाई केली, त्यापैकी एकही जण पुढे आला का? किंवा असा दावा केला का? की आमच्यावर पुराव्याशिवाय कारवाई केली. मग कर नाही तर डर कशाला? अशा शब्दात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मलिक यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतरच त्यांना ५५ लाख भरावे लागले होते, याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()