Dhangar Reservation: बिडकीन येथे वीर एकलव्य भिल्ल समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन..

Dhangar reservation: धनगर समाजाचा आदिवासी समुहामध्ये समावेश करु नये या प्रमुख मागणीसाठी हा रास्तारोको करण्यात आला होता.
Dhangar reservation
Dhangar reservationSakal
Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन.ता. येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील निलजगाव फाटा येथे वीर एकलव्य भिल्ल समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन चे आज (ता.३०) सोमवार रोजी दुपारच्या वेळी आयोजन करण्यात आले होते.

Dhangar reservation
Dhangar Reservation: मुख्यमंत्री म्हणतात देऊ, पण महायुतीतच धनगर आरक्षणाला विरोध!; 'या' नेत्यानं स्पष्ट केली भूमिका

यावेळी हे आंदोलन संदिप सुरेश गायकवाड, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी चंदा पवार,शिवा गोरे, सुनिल गोरे,समिर गोरे, सुनिल जाधव,किरण गांगुर्डे, सुरेश दळवी,दिपक एरंडे आदींसह महिला व नवतरुण समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

एकलव्य भिल्ल समाज संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाजबांधव यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सदरचे निवेदन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना भिल्ल समाजाच्या वतीने देण्यात आले.यावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.