रुग्ण तडफडताहेत, 'पीएम केअर्स'चे व्हेंटीलेर्स नादुरुस्तच

आता या अशा नादुरुस्त पुरवठा केलेल्या आणि आठ महिन्यांपासून धुळखात पडण्याच्या कारणांचे श्रेय कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पीएम केअर्स फंड आणि व्हेंटिलेटर्स
पीएम केअर्स फंड आणि व्हेंटिलेटर्स
Updated on

बीड : मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाची (Corona Virus Infection) लागण झाली आणि साधारण ऑगस्ट महिन्यात पीएम केअर्स फंडामधून (PM Cares Fund) जिल्ह्यातील (Beed) विविध आरोग्य संस्थांना व्हेंटीलेटर्स (Ventilators) भेटले. मात्र, यातील बहुतांशी व्हेंटीलेटर्स नादुरुस्तच असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्ण व्हेंटीलेटर्स अभावी तडफडत असताना पीएम केअर्समधील नादुरुस्त व्हेंटीलेटर्स धुळखात पडून आहेत. विशेष म्हणजे व्हेंटीलेटर्स पुरवठा केल्यानंतर त्याचा डेमोही दिलेला नसून आता गरजेच्या वेळी पाठपुरावा करुन आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले. मात्र संबंधित यंत्रणेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसादही भेटत नसल्याचे पत्रव्यवहारावरुन समोर आले आहे. एकट्या लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व उपचार व मानसिक आरोग्य केंद्र आणि स्त्री रुग्णालय या दोन संस्थांमध्ये उभारलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात तब्बल ६६ आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ( Swami Ramanand Thirth Medical College And Hospital) १७ व्हेंटीलेटर्स नादुरुस्त असल्याने धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे. (Ventilators Not Repaired Which Come Through PM Cares Fund Beed News)

पीएम केअर्स फंड आणि व्हेंटिलेटर्स
Video: पैठण तालुक्यातील आडुळमध्ये कोरोना काळात दुकाने सुरु, प्रशासनाकडून कारवाई

कोरोना विषाणू संसर्गावरील उपचार, उपाय योजना, रेमडेसिविर, व्हॅक्सिनवरुन राजकीय पक्षांची एकमेकांवर चिखलफेक आणि उपाय योजनांची साधने उपलब्ध करुन दिल्यावरुन श्रेय घेतले जात आहे. आता या अशा नादुरुस्त पुरवठा केलेल्या आणि आठ महिन्यांपासून धुळखात पडण्याच्या कारणांचे श्रेय कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर उपचारांसठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून त्यावेळी व्हेंटीलेटर्स होते. साधारण ऑगस्ट महिन्यात पीएम केअर्समधून अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लोखंडीचे जम्बो कोविड हॉस्पिटल, बीडचे जिल्हा रुग्णालयासह केजचे उपजिल्हा रुग्णालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, गेवराईचे ग्रामीण रुग्णालय, माजलगावचे ग्रामीण रुग्णालय, आष्टीचे ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी पीएम केअर्समधून थेट व्हेंटीलेटर्सचा थेट पुरवठा करण्यात आला. मात्र, पुरवठा केल्यानंतर संबंधित कंपनीच्या अभियंत्यांनी डेमो देणे आवश्यक असताना तसे काहीही झाले नाही. दरम्यान, पहिल्या लाटेत यंत्रणेकडे असलेल्या पूर्वीच्या व्हेंटीलेटर्सवर भागून गेले. पण, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर्स आणि रेमडेसिविरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लोखंडीच्या जम्बोत व्हेंटीलेटर्स शोभेच्या वस्तू

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असलेल्या लोखंडीच्या वृद्धत्व आजार व मानसिक उपचार या दोन संस्थांत उभारलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला प्रत्येकी ४० असे ८० व्हेंटीलेटर्स पुरविण्यात आले. पहिल्या लाटेत या व्हेंटीलेटर्सची गरज पडली नाही. मात्र, आता या ठिकाणी सातशेंवर रुग्ण उपचार घेत असून अनेकांना उपचारासाठी व्हेंटीलेटर्सची गरज आहे. मात्र, ऑक्सिजन प्रेशर नसणे, नॉब नसणे, वायरिंग अशा त्रोटक बाबींनी हे व्हेंटीलेटर्स धुळखात पडून आहेत. यापैकी १४ व्हेंटीलेटर्स स्वारातीमध्ये नेण्यात आले असून त्यांना दुरुस्त करण्यात आले.

आकडा ३६६; सुरु अडीचशे; गरज आणखी शंभरची

जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हा रुग्णालयासह इतर शासकीय आरोग्य संस्था व खासगी रुग्णालयांतील व्हेंटीलेटर्सची प्रशासनाकडील आकडेवारी ३६६ आहे. मात्र, यातील सुरु असलेल्या व्हेंटीलेटर्सची संख्या साधारण २५० असू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या ७० हजारांच्या घरात असून सक्रिय रुग्णांचा आकडा १३ हजारांच्या आसपास आहे. यातील सहा हजारांवर रुग्ण विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आजही जिल्हाभरात एसपीओटू (रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) ६० ते ८० च्या घरात असलेले आणि एचआरसीटी स्कोअर २० च्या घरात अशा व्हेंटीलेटर्सची गरज असलेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे आहे. असे चित्र असताना पीएम केअर्समधील व्हेंटीलेटर्स नादुरुस्त असल्याने पडून आहेत.

पीएम केअर्स फंड आणि व्हेंटिलेटर्स
सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

पत्रव्यवहार करुन प्रशासनही थकले

मागच्या वर्षी पुरवठा करणाऱ्यांनी डेमोही दिला नाही. आता गरज पडल्यानंतर आरोग्य संस्थांकडून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यालाही कोणी प्रसिताद देत नाही. अगदी बंगळुरु (कर्नाटक) येथील पीएम केअरच्या अभियंत्यांपर्यंत आरोग्य यंत्रणांनी पाठपुरावा केला आहे.

पीएम केअर्स फंड आणि व्हेंटिलेटर्स
माणुसकीचा झरा! स्वखर्चाने 'ती' करतात मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जिल्ह्यात शंभरावर रुग्णांना आजही व्हेंटीलेटर्सची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारकडून असे निकृष्ट व्हेंटीलेटर्स पाठविल्याने हे संकट उभारले आहे. राज्य सरकारवर चिखलफेक करणाऱ्या भाजपने आपल्या घरात डोकून पाहावे.

- संजय दौंड, आमदार, विधान परिषद.

ग्रामीण भाग असल्याने बायोमेडिकल इंजिनीअर उपलब्ध होत नाहीत. याचे पार्ट देखील पुणे - मुंबईसारख्या ठिकाणीच उपलब्ध होतात. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो.

- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.