पैठण : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यास दोन अडीच महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पैठण मतदार संघात मतदान यंत्रांची मोबाईल व्हॅनव्दारे गावोगावी जनजागृती करण्यात येत असून नागरिकांना मतदान प्रात्यक्षिक केंद्र सुरु करण्यात आले आहे.
पैठण येथे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ, तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान पैठण मतदार संघातील ३२६ मतदान केंद्रावर मतदान जन जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या लोकसभेसाठी एप्रिल व मे महिन्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक देखील याच कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे.
मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मतदान यंत्रे बंगलोर येथून आणण्यात आली आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट ही यंत्रे निवडणूक विभागाने मतदानासाठी सज्ज केली आहेत. ही मतदान यंत्र स्ट्रॉगरुममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून मतदार यादी बिनचूक करण्यात येत आहे. यामध्ये नवीन मतदारनोंदणी, दुरुस्ती, वगळणी आदी आदी कामे सुरु आहेत.
लोकसभा वापरली जाणारी निवडणुकीसाठी जाणारी अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदारांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने १० डिसेंबर ते २९ फेब्रुवारी या कालावधीत गावोगावी जाऊन नागरिकांना मतदान प्रात्यक्षिक दिले जात आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.
तहसील कार्यालयातही प्रात्यक्षिक
मतदान प्रात्यक्षिक आणि जनजागृतीतून नागरिकांमधील भीती दूर करणे आणि आणि मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यात गावोगावी मतदान यंत्रे घेऊन मोबाईल व्हॅनb फिरत आहे. तसेच तहसील कार्यालयात देखील मतदान यंत्रांची जनजागृती आणि मतदान प्रात्यक्षिक केंद्र सुरु करण्यात आले आहे. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.