Aurangabad : सोयगाव नगरपंचायतीसाठी आज निवडणूक, मतदानाचा टक्का वाढला

चारही मतदान केंद्रांवर वाढती गर्दी पाहता पोलिसांनी तातडीने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले होते.
Soygaon Municipal Council Election
Soygaon Municipal Council Electionesakal
Updated on

सोयगाव (जि.औरंगाबाद) : जिल्ह्यात एकमेव होऊ घातलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (ता.१८) पहाटे मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याने मतदानाचा टक्का वाढला असून ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. सोयगाव नगरपंचायतसाठी (Soygaon Municipal Council Election) मंगळवारी चार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत यांनी प्रक्रियेवर लक्ष ठेवत पोलिसांचीही करडी नजर होती. पहिल्या टप्प्यासाठी चार प्रभागांसाठी एक हजार ७०८ मतदारांपैकी ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची होणारी गर्दी पाहता कोरोना संसर्गाचे नियम पाळण्यासाठी मतदारांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी, औरंगाबाद (Aurangabad) यांनी सूचना देताच मतदान केंद्रावर मतदारांमध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळण्यात आला होता. त्यामुळे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना अंतरात उभे करण्याची जबाबदारी निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांवर आली होती. (Voting Percent Hikes For Soygaon Municipal Council Election)

Soygaon Municipal Council Election
केवळ ६३ हजारांमध्ये खरेदी करा Tata Tiago,जाणून घ्या तपशील

मतदान केंद्रांवर दंगल नियंत्रक पथक तैनात

शहरातील चारही मतदान केंद्रांवर वाढती गर्दी पाहता पोलिसांनी तातडीने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. त्यामुळे ऐनवेळी पथकाला चारही मतदान केंद्रावर पाचारण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.

पहाटेचं थंडीत कुडकुडत पार पाडले कर्तव्य

पहाटे असलेल्या थंडीच्या कडाक्यातही मतदारांनी पहाटे मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे सोयगावला जम्मू काश्मीरचे स्वरूप प्राप्त झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()