रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची गरुडझेप, मेहनतीच्या जोरावर बनली PSI

रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराची मुलगी राधिका ही जिद्द, चिकाटीच्या जोरावर बनली पीएसआय
Radhika Shinde Become PSI
Radhika Shinde Become PSIesakal
Updated on

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : रोजंदारीवर काम करणारे पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील मजूर म्हसू शिंदे यांची मुलगी राधिका ही जिद्द, चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ही राधिकाचे कौतुक करत तिचा सत्कार केला. पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील रोजंदारीवर काम करणारे म्हसू शिंदे हे मजूर असून ते पोट भरण्यासाठी भटकंती करत समनापूर येथे काही वर्षांपासून राहात आहे. (Wage Labourer Daughter Radhika Shinde Become Police Sub Inspector)

Radhika Shinde Become PSI
'काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार'

त्यांना दोन मुली व मुलगा असून त्यांनी आपल्या मुली अंकुशनगर (ता. अंबड, जि.जालना) येथील शाळाबाह्य मुलींची शाळा असलेले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (आश्रम शाळा) येथे पाचवीपर्यंत शिकवले. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर राधिका शिंदे हिने औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयातून पदवी संपादन केली आहे.

Radhika Shinde Become PSI
हवेली : MPSC परीक्षेत सदाशिव राज्यात दुसरा; गावाकडून कौतुक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तिने यश संपादन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()