Chh. Sambhajinagar : शहराचा पाणीपुरवठा १४ तासांनंतर सुरू; पाइपलाइन फुटल्याने अनेक भागांत दोन दिवसांचा खंड

जुन्या शहरातील अनेक भागांना दोन दिवसांचा पाणी पुरवठाचा खंड
water supply
water supply sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकताना जेसीबीचा धक्का लागल्याने ७०० मिलिमीटर व्यासाची जुनी पाइपलाइन बुधवारी (ता. २०) पैठण रोडवरील गेवराईजवळ सकाळी १०.३० वाजता फुटली होती. त्यानंतर जुन्या शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. महापालिकेने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले, पण दुरुस्तीसाठी तब्बल १४ तासांचा कालावधी लागला. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहेत.

water supply
Sambhajinagar : शाळेत बाकड्यावर बसण्यावरून वाद; चार वर्गमित्रांच्या मारहाणीत कार्तिकचा दुर्दैवी अंत

शहराचा पाणी पुरवठा विविध कारणांमुळे वारंवार विस्कळित होत आहे. तांत्रिक बिघाडासह नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे वारंवार पाइपलाइन फुटत आहे. जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाअंतर्गत सध्या ९०० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे.

water supply
Chh. Sambhajinagar crime : तोतया ‘पीएसआय’चा अखेर भरला घडा!

हे काम करताना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गेवराई गावाजवळ जेसीबीचा धक्का लागल्याने ७०० मिलिमीटर व्यासाची जुनी पाइपलाइन फुटली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने तातडीने जायकवाडी येथून योजनेचा पाणी पुरवठा बंद केला.

पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, उपअभियंता किरण धांडे, एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता सुहास लोहाडे, आशिष वाणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. मध्यरात्री १२.३० वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले, पण शहरात पाणी देण्यासाठी रात्रीचे दीड वाजले.

water supply
Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; विभागप्रमुखांच्या अहवालानंतर कारवाई

काही जलकुंभात सकाळपर्यंत मुबलक पाणी आल्यानंतर ज्या भागाला बुधवारी (ता. १९) पाणी पुरवठा झाला नव्हता त्या भागाला पाणी देण्यात आले. तर अनेक भागाला निर्जळीचा सामना करावा लागला. आता पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.