औरंगाबाद : राज्यातील ओबीसी समाज (OBC Community) केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे नाराज आहे. प्रत्येक वेळी ओबीसी समाज व नेत्यांना डावलले जात असेल तर त्यांनी दुसऱ्यांच्या घरात न राहता स्वतःचे घर तयार करावे, कारण ज्याचे दल त्याचेच बल असते. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी स्वतःच घर करून डिमांडर नाही तर कमांडर व्हावे, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला. पक्षाच्या वतीने सोमवारी (ता.९) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जानकर यांनी ओबीसी समाज व नेत्यांवर भाष्य केले. या वेळी ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर ओबीसी समाज प्रचंड नाराज आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजात अस्वस्थता आहे. त्यासाठी ओबीसीची राष्ट्रीय जनगणना (Aurangabad) झाली पाहिजे. अशी रासपाची प्रमुख भूमिका आहे.
त्यासाठी वेळप्रसंगी जनआंदोलन उभारून मोदी सरकारला राष्ट्रीय जणगणना करण्यास भाग पाडू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती करताना ओबीसी, मुस्लीम समाजातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करावी, मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाबाबत प्रश्न सरकारने निकाली काढावा, अशी मागणी जानकर यांनी केली. यावेळी पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतोले, प्रदेश प्रवक्ते प्रा.भास्कर टेकाळे, मराठवाडा संपर्कप्रमुख अशोक लांडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुरेश कटारे, शहर जिल्हा अध्यक्ष राशीद खान, महिला आघाडीच्या शीतल कांबळे, युवक जिल्हाअध्यक्ष दिलीप रिठे, देवीदास नजन, किशोर माळी, प्रल्हाद सोरमारे, देवका शेळके, कल्पना महाकाळे, नवनाथ शिंदे उपस्थित होते.
मनपा निवडणूक स्वबळावर लढवणार
पक्षाच्यावतीने राज्यातील विधानसभा निहाय संपर्क दौरे करण्यात येत आहेत. राष्ट्रीय समाजपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढणार असून औरंगाबाद महानगरपालिकेच्या ११५ जागा स्वबळावर लढवल्या जाणार आहे. या निवडणुका शहराच्या पाणी, रस्ते, रोजगार यासह विकासाच्या मुद्द्यावर यासाठी बूथ, वॉर्ड बांधणीचा आढावा घेतला असता ५६ वॉर्डामध्ये उमेदवाराची चाचणी अंतिम टप्यात असल्याचे जानकर म्हणाले.
बहीण जेव्हा भावाला सांगेल तेव्हा पाहू!
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतो का, या प्रश्नावर बोलताना जानकर म्हणाले, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, अद्याप तरी पंकजा यांनी आपल्याला त्याबाबत काहीही सांगितले नाही. आपल्यावर अन्याय होतो असे बहीण जेव्हा भावाला सांगेल तेव्हा भावाला कळेल, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.