Sambhaji Raje
Sambhaji Raje Esakal

संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही - मराठा क्रांती मोर्चा

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवर मोर्चाचे पदाधिकारी नाराज
Published on

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली आहे. (We do not accept leadership of Sambhaji Raje Chhatrapati says Maratha Kranti Morcha)

Sambhaji Raje
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर तात्पुरती टोल माफी

औरंगाबाद इथं माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, "छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा डाव रचला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व

"काही लोक आमचं नेतृत्व करायला निघाले आहेत. नेतृत्व जर करायचं असेल तर ते सर्वसमावेशक असायला हवं असं आमचं मत आहे. ज्यावेळी कोपर्डीचं प्रकरण घडलं त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. पण कालच्या बैठकीला त्यातील कोणीही नव्हतं. मराठा समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी संभाजीराजेंना कोणी दिली? ते आम्हाला मान्य नाही. आम्ही यापूर्वीही सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं नेतृत्व आहेत.

तर पळता भुई थोडी करु

म्हणून आम्ही इशारा देतोय की, "तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठक घेता, हे काय चाललं आहे. सर्वव्यापक बैठक का घेत नाहीत. अचानक दोन दिवसात बैठक का बोलवता? त्या बैठकीला व्यापक बैठकीचं स्वरुप देता. मोजके चेहरे गोळा करता आणि काय चर्चा करता? मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कोणाचं नाही. जर व्यवस्थित चर्चा होणार नसेल आणि जवळचा माणूस हाताशी धरुन जर तुम्ही आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणार असाल तर तुमची पळता भुई थोडी करु" असंही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()