Maratha Reservation : आम्हाला दहा लाखाची मदत नको, पण त्या सदावर्ते अटक झालेली दाखवा; मयत कुबेरच्या आजोबांची मागणी

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मयत कुबेरच्या आजोबांची मागणी
We do not want the aid of ten lakhs perpetually arrested Gunaratna Sadavarte ganesh kuber suicide case
We do not want the aid of ten lakhs perpetually arrested Gunaratna Sadavarte ganesh kuber suicide caseSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका असे संदेश लिहत आपतगावच्या गणेश कुबेर यांनी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या नंतर मराठा समाजाने या प्रकरणी अडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गणेशचा मृतदेहाला हात लावणार नाही.

अशी भूमिका मराठा समाजाने घेतली. तर आम्हाला सरकारची दहा लाखाची मदत नको मात्र त्या सदावरती वर गुन्हा दाखल करत त्याला अटक करा तेव्हाच आम्ही या मृतदेहाला हात लावू अशी आग्रही भूमिका गणेशचे आजोबा जनार्दन पाटील कुबेर यांनी घेतली.

गणेश कुबेर याने आत्महत्या केल्यानंतर एडवोकेट गुणवंत सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यानंतरच गणेशच्या मृतदेहाला हात लावा अशी भूमिका मराठा समाजातर्फे घेण्यात आली होती त्यावेळी पोलिसांतर्फे त्यांना घाटीत नेल्यानंतर याविषयी गुन्हा दाखल करू असे लेखी देण्यात आले होते. त्यामुळे समाजातर्फे गणेश यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यांचा पोस्टमार्टम करण्यासाठी रात्री साडे नऊ वाजता पोस्टमार्टम साठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर. मात्र या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल व लेखी दिलेले आश्वासन पाळल्यामुळे कुटुंबियांनी पोस्टमार्टम करण्यास विरोध दर्शविला.

जोपर्यंत सदावर्ते वर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचायत झाली पोलिसांतर्फे विविध माध्यमातून गणेश कुबेर यांच्या नातेवाईकांच्या व कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र समाज व कुटुंबीय आडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत पोस्टमार्टम होऊ शकलं नाही.

समाजातर्फे ही पोलिसांना तीन वाजेची वेळ देण्यात आली होती दरम्यान याची माहिती मिळताच पोस्टमार्टम विभागाच्या समोर मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. गणेशचे आजोबा जनार्दन कुबेर पाटील म्हणाले की, आम्हाला लेखी आश्वासन पोलिसांनी दिलं आमचा पोलिसांवर विश्वास आहे मात्र घाटीत आल्यानंतर पोलीस का बदलले याचेच आश्चर्य वाटत आहे.

आम्हाला सरकारी मदत नको फक्त गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्ही चर्चा करा मार्ग काढा पण गुन्हा दाखल करा अशी भूमिका आहे पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे पोलीस आयपीएस अधिकारी या सर्वांनी समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न व यशस्वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.