छत्रपती संभाजीनगर : वातावरणात हवेचा दाब वाढले की थंडी वाढते. सध्या हवेचा दाब कमी आहे. त्यामुळे गारठाही कमी आहे. परंतु, येत्या पंधरवड्यात हवेचे दाब वाढणार आहे. त्यामुळे थंडी वाढेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केला. जेव्हा उष्ण वारे असतात, हवेचा दाब कमी होतो, तेव्हा थंडीही कमी होते. दाब वाढला की थंडी वाढते, हे कमाल आणि किमान तापमानामुळे घडते, असेही डॉ. साबळे म्हणाले.