छत्रपती संभाजीनगर : ‘हिट ॲण्ड रन’च्या विरोधात रिक्षा चालकांनी बुधवारी (ता. १०) संप केला. या संपचा फायदा ‘स्मार्ट सिटी’ च्या सिटी बसला झाला. दिवसभरात सुमारे ऐंशी हजार प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे उत्पन्नात नऊ लाखांची वाढ झाल्याचे स्मार्ट सिटीतर्फे सांगण्यात आले.
रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच रिक्षा बंद होत्या. एरवी गजबजलेला जालना रस्ता सुनासुना दिसत होता. रिक्षाच नसल्याने शहर बसचे महत्त्व वाढले. सिटीबस विभागाचे प्रमुख संजय सुपेकर यांनी यासंदर्भात सांगितले की, सिटी बसच्या माध्यमातून सरासरी २८ हजार प्रवासी प्रवास करतात आणि त्या माध्यमातून दररोज आठ लाखांचे उत्पन्न सिटीबस विभागाला होते.
बुधवारी तब्बल ८० हजार प्रवाशांनी सिटीबसमधून प्रवास केला व १७ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. दररोज नव्वद सिटी बस चालवल्या जातात, रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पाच बस वाढवण्यात आल्या होत्या, या सर्व शहर बस दिवसभर हाऊसफुल्ल झाल्या होत्या, असेही संजय सुपेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.