औरंगाबाद : औरंगाबादच्या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करावे, असा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करून तो दिल्ली दरबारी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाचे पुढे काय झाले, अशी विचारणा दिल्लीला करण्याची वेळ आली आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या नामांतरावर प्रश्न विचारणाऱ्या भाजपला लगावला. नूतनीकरण केलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन मंगळवारी (ता.२५) झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या औरंगाबादच्या सभांना मैदाने कमी पडायची. जनतेला अनेक आश्वासने दिलेली आहेत. शिवसेनेने त्यावर विश्वास ठेवून महापालिकेतील भगवा जनतेने उतरू दिला नाही आणि उतरणार नाही. पण जनतेला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेना विसर पडलेला नाही. रस्त्यांची कामे सुरू आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले. पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. त्यात नूतनीकरण झालेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे आज उद्घाटन झाले. या नाट्यगृहात शिवसेनेचे अनेक कार्यक्रम झाले. आता नवे नाट्यगृह कसे आहे, ते पाहण्यासाठी मी येईल. संभाजीनगर नावाचा विषय राहिलाच आहे; पण गतवर्षी विधिमंडळात औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्याचा ठराव मंजूर करून तसा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला, त्याचे काय झाले, हे विचारण्याची वेळ आली आहे. विमानतळाचे आम्हांला बारसे करून हवे आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ एक अभिमान वाटणारे नाव, लवकरच केंद्र शासन हा अभिमान वाटण्याचा आनंद लवकरात लवकर दिल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेना औरंगाबादचे नामांतर करू शकली नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल लगावला होता. त्यावर ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज विमानतळाच्या नामकरणाचा विषय पुढे केला आहे.पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती राजू वैद्य, राजू शिंदे, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, अंकिता विधाते, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय आदी व्यासपीठावर होते. प्रशासक पांडेय यांनी प्रास्ताविक केले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आभार मानले. राजू वैद्य यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा सत्कार केला.
रस्त्यांचा प्रस्ताव विचाराधीन
शहरातील उर्वरित रस्त्यांची कामे करण्याचा ३१७ कोटींचा राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
जनतेच्या कामांत राजकारण नको
नामांतराच्या विषयानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेची कामे करताना राजकारण करू नये, असे आवाहन केले. राज्याकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविले जातील. दिल्लीतील प्रश्नांसाठी खासदारांनी पाठपुरावा करावा, डॉ. भागवत कराड आहेत, शेजारी रावसाहेब दानवे आहेत, त्यांनी दिल्लीत पाठपुरावा करावा, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.