राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार का? उद्या होणार निर्णय

१ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी यापूर्वीच केली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, उद्या या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. (Will Raj Thackeray meeting in Aurangabad be allowed possibility of decision tomorrow)

Raj Thackeray
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विद्यार्थ्यांचा मंत्रालयात ठिय्या

निखिल गुप्ता म्हणाले, "आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि फील्डमधील सर्व रिपोर्ट घेऊन उद्यापर्यंत आवर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आमच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक आहे, ती झाल्यानंतर सर्व बाबींचा विचार करुन उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल"

Raj Thackeray
CAA कायदा सुधारात्मक, प्रत्येक भारतीयासाठी होणार नाही लागू - MHA

राज ठाकरे यांची आझाद मैदानावर गुढी पाडव्याच्या दिवशी मेळावा पार पडला होता. यावेळी भाषण करताना त्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास दीड महिन्याहून अधिक काळ हा मुद्दा चर्चेत असून भाजपनेही यामध्ये उडी घेत सरकारला सातत्यानं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यात केली होती सभेची घोषणा

मधल्या काळात पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला रमजानचा महिना संपेपर्यंत ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला होता. तसेच याच पत्रकार परिषदेत आपण १ मे रोजी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनं या सभेला परवानगी देण्यास उत्सुक असल्याचं दिसत नाहीए.

मनसेची सर्व तयारी पूर्ण, प्रचारगीतही लॉन्च

मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी पूर्ण केली असून यासाठी खास प्रचारगीतही लॉन्च केलं आहे. पण अद्याप सभेला पोलिसांनी परवानगीच न दिल्यानं ही सभा होईल की नाही? याबाबत संभ्रम कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.