Winter Cold : थंडी गायब; उबदार कपड्यांच्या मार्केटला झळ

थंडीची चाहूल लागताच शहरवासीय मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करतात.
Cloth Market
Cloth MarketSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - थंडीची चाहूल लागताच शहरवासीय मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुरेशी थंडी जाणवत नाही. याची झळ उबदार कपडे विक्री करणाऱ्यांना बसत आहे. यंदा थंडी कमी राहिली तर ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

आजमितीला तिबेटियन बाजारात दैनंदिन सरासरी केवळ ४ ते ५ उबदार कपड्यांची विक्री होत आहे. बऱ्यापैकी थंडीचा मौसम सुरू झाल्यास हीच संख्या ५० ते ६० वर जाऊ शकते, असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून तिबेटियन मार्केटमध्ये एकूण ५० स्टॉल लावण्यात आले आहे. तर गतवर्षी मालाची विक्री होऊनही काही माल तसाच उरला आहे.

मात्र, यावेळी देखील अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, भरपूर माल उरणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. हे स्टॉल्स जानेवारी अंतिमपर्यंत सुरू राहतील. यंदा काही उबदार कपड्यांचे दर कमी झाले तर काहींचा दर तोच ठेवल्याची माहिती तिबेटियन स्वेटर विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष एस. डी. चौबेल यांनी दिली.

तिबेटियन मार्केटमधील सध्याचे दर (रुपयांमध्ये)

  • जर्किंग - ५५० ते १,५००

  • जॅकेट - ४५० ते १,३००

  • कॅप - १०० ते २७०

  • मफलर - २००

  • स्वेटर - ७९० ते १,३८०

  • शॉल - ४०० ते १,२००

  • उबदार शूज - २०० ते ५००

  • हॅन्डग्लोज - १५० ते २५०

  • सॉक्स - १५० ते २५०

तापमान वाढलेलेच

मागील आठवड्यात पहाटेचे तापमान १३ ते १८ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे. तर दिवसभराचे तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहाटेचे तापमान किमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे यंदा थंडी गायब असून याचा परिणाम उबदार कपडे विक्रेत्यांवर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.