भावाला आत्महत्येपूर्वी पाठवला मेसेज,धावत्या रेल्वेतून महिलेने लेकीसह मारली उडी

महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह धावत्या रेल्वेतून मारली उडी
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newsesakal
Updated on

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद ) : लासुर स्टेशन- पोटूळ रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या खडकनारळा परिसरात चोवीस वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.आठ) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी महिलेच्या सापडलेल्या मोबाईलमधून भावाला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केल्याचे आढळून आले. या मायलेकी औरंगाबाद (Aurangabad) येथील बालाजीनगरच्या रहिवासी असल्याचे कळते. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महिलेने दुपारी एक ते दोनच्या दरम्यान सचखंड एक्स्प्रेसमधून (Sachkhand Express) उडी मारली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांना ही घटना कळवत रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमाणी हे शिल्लेगाव पोलीसासह घटनास्थळी दाखल झाले होते. (Woman Jump With Daughter Through Running Railway Near Lasur Station Of Aurangabad)

Aurangabad Crime News
कोरोना पुन्हा वाढतोय! दिल्ली, हरयाणासह ५ राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ

शिल्लेगाव हद्दीतील खडकनारळा परिसरात पुनम गणेश विसपुते (वय २४, रा.नवसारी, गुजरात, ह.मु.बालाजीनगर, औरंगाबाद) यांनी मुलगी संभवी विसपुते (वय २ ) हिच्यासह रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती मिळताच शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी मृत महिलेचा मोबाईल मिळून आला असून त्यामध्ये तिने तिचे भाऊ यास मेसेज पाठवला आहे.

Aurangabad Crime News
दबाव सहन करणार नाही, रशियाबाबत भारताने स्पष्ट केली भूमिका

ज्यात तिने लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. महिला व मुलीला तत्काळ लासूर स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मायलेकींना तपासून मृत घोषित केले. या महिलेचे नातेवाईक घटना कळताच आलेले आहेत. शिल्लेगाव पोलीस पुढील चौकशी करून कार्यवाही करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()