दागिने खरेदीच्या बहाण्याने तरुण सराफा व्यापाऱ्याचा खून

विशाल सुभाष कुलथे
विशाल सुभाष कुलथे
Updated on
Summary

लग्नात दागिने करायचे राहून गेल्याचे सांगून विशाल कुलथेला दागिन्यांची ऑर्डर दिली. गुरुवारी विशाल कुलथे बीडहून दागिने घेऊन शिरुरकडे असतानाच हिवरसिंगाला दुचाकीचा अपघात झाला.

शिरूर कासार (जि.बीड) : दागिने खरेदीच्या बहाण्याने (Beed) तरुण सराफा व्यापाऱ्याला बोलावून त्याचा खुन करुन मृतदेह शेवगाव (Shegaon) तालुक्यात (जि.अहमदनगर) (Ahmednagar) नेऊन पुरल्याची घटना रविवारी (ता. २३) समोर आली. स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलिसांनी (Shirur Kasar Police) दोघांच्या मुसक्या आवळल्या असून मास्टरमाईंड फरार आहे. विशाल सुभाष कुलथे (वय २४, रा. शिरुर कासार) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (वय २२, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव जि. अहमदनगर, हमु. शिरुर कासार), धीरज अनिल मांडकर (२१,रा.आनंदनगर, पाथर्डी जि. अहमदनगर) व धीरज अनिल मांडकर (२१,रा.आनंदनगर, पाथर्डी जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारपासून (ता. २०) विशाल कुलथे बेपत्ता होता. शुक्रवारी (ता.२१) शिरुर ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद झाली. (Young Jeweller Killed For Jewellery In Shirur Kasar)

विशाल सुभाष कुलथे
जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका, जलील यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

दरम्यान, बेपत्ता झाला तेव्हा विशाल ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड याच्यासोबत दुचाकीवरुन गेल्याचे कुटुंबीयांनी पाहिले होते. ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरुर आजोळ असून तो मामाच्या सलूनच्या दुकानात काम करतो. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत व शिरुर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत धीरज अनिल मांडकर यास ताब्यात घेतले. 'खाक्या' दाखविल्यावर त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. ज्ञानेश्वर गायकवाडचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नात दागिने करायचे राहून गेल्याचे सांगून विशाल कुलथेला दागिन्यांची ऑर्डर दिली. गुरुवारी विशाल कुलथे बीडहून दागिने घेऊन शिरुरकडे असतानाच हिवरसिंगाला दुचाकीचा अपघात झाला. यावेळी विशाल कुलथेने ज्ञानेश्वर गायकवाडला बोलावून उपचार घेतले आणि दोघेही शिरुरला आले. त्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाडने नगर जिल्ह्यातील नातेवाईकांकडेही लग्न समारंभ आहे.

त्यांना दागिने दाखवून येऊ असे सांगून त्याला दागिन्यांची पेटी घेऊन सोबत नेले. मध्येच वजन करण्याची पेटी व पैशांच्या बहाण्याने तळमजल्यातील दुकानात नेले. कात्री गळ्यात खुपसून विशालचा खुन केला. त्यानंतर धीरज मांडकर याच्या मदतीने ज्ञानेश्वरने विशालचा मृतदेह शॉलमध्ये गुंडाळून दुचाकीवरुन रात्रीतून भातकुडगाव (ता.शेवगाव जि.अहमदनगर) येथे नेऊन शेतात पुरला. सोन्याचे दागिने ज्ञानेश्वरने स्वत:कडे ठेवले तर चांदीचे दागिने केतन लोमटेकडे दिले. गुन्हे शाखेने केतन लोमटेच्या मुसक्या आवळत त्याच्या घरातून चांदीचे दागिने हस्तगत केले. सध्या धीरज मांडकर व केतन लोमटे हे दोघे पोलिसांच्या ताब्यात असून ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार आहे. दरम्यान, रविवारी सकाळी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा पुरलेले प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत , शिरुर ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार, सतीश कातखडे, आलीम शेख, मुकुंद सुस्कर, संगीता सिरसाट यांचा कारवाईत सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()