Aurangabad | किरकोळ कारण...तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

नचिकेत हा मॅकेनिकल इंजिनिअर होता.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newsesakal
Updated on

करमाड (जि.औरंगाबाद) : किरकोळ वादावादीवरून घरातून रागावून निघून गेलेल्या मुलाचा गाढेजळगाव (ता.औरंगाबाद) येथील जालना महामार्गालगत असलेल्या वनविभागाच्या जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नचिकेत सुदाम गाडेकर (वय २३, रा. गाढेजळगाव, ता. औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो गेल्या १८ जूनपासून बेपत्ता होता. (Youth End Himself After Minor Cause In Gadhejalgaon Of Aurangabad)

Aurangabad Crime News
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, ६ हजार ४९३ जण बाधित

दरम्यान, घटनास्थळी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याने ५-६ दिवसांपूर्वीच झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी मृतदेह झाडावरून खाली कुजलेल्या अवस्थेत होता. याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सांगितले की, नचिकेतचा गेल्या १८ जून रोजी घरच्यांसोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर तो घरातून काहीही न सांगता मोबाईल घरीच सोडून गायब झाला होता. सगळीकडे शोधाशोध करूनही तो न आढळल्याने वडील सुदाम गाडेकर यांनी १९ जून रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात केली होती. तेव्हापासुन गाडेकर कुटुंबियांसह पोलिसांकडुन त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, रविवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना महामार्गालगतच्या वन विभागाच्या कवडी पीरबाबा दर्गाच्या पाठीमागील डोंगरांमध्ये एक अनोळखी पुरुष गळफास घेतलेल्या स्थितीत जनावरे चारणाऱ्या काही लोकांना दिसून आला. याबाबत पोलीस पाटील यांनी करमाड पोलीसांना कळविले. (Aurangabad Crime News)

Aurangabad Crime News
प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुदाम गाडेकर यांनी कपड्यावरून तो त्यांचा मुलगा नचिकेत असल्याचे सांगितले. तथापि, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहीन हाश्मी यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. पोलिसांनीही घटनास्थळीच पंचनामा करीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह हलविण्याच्या स्थितीत नसल्याने व कुजल्याने दुर्गंधी येत असल्याने पोलिसांच्या विनंती सुचनेवरून जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर युवकाने गळफास घेतला असावा, कारण दोरी झाडाला लटकलेली होती व मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत कुजलेल्या स्थितीत खाली पडलेला होता. दरम्यान, या घटनेने गाडेकर कुटुंबियांवर व गाढेजळगाव ग्रामस्थावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंत्यसंस्कार प्रसंगी प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता.

Aurangabad Crime News
उदय सामंतही बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटात सामील, रॅडिसन ब्लूमध्ये दाखल

उच्चशिक्षित नचिकेतने उचलले टोकाचे पाऊल

नचिकेत हा मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) होता. एवढ्या उच्च शिक्षित मुलाने घरातील छोट्या किरकोळ वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही वेळा पुरते रागावर नियंत्रण मिळवू शकला असता तर आज हा दिवस बघायला मिळाला नसता असे अनेक जण अंत्यसंस्कार प्रसंगी बोलत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ह्योसंग या कंपनीत कंत्राटदाराच्या माध्यमातुन नोकरीही केली. मात्र, कंपनीतून गॅप मिळाल्याने तो काही महिन्यांपासून गावातच कॉम्पुटर जॉब करीत असल्याचे कळते. गेल्या १८ तारखेला त्याचे घरच्यांसोबत किरकोळ भांडण झाले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, पोलीस नाईक प्रेम म्हस्के, सुनील लहाने व श्री. कांबळे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()