दीड वर्षानंतर भरली शाळा, गावकऱ्यांमुळे विद्यार्थी आनंदी

school
school
Updated on

कायगाव (जि.औरंगाबाद) : गंगापूर Gangapur तालुक्यातील गणेशवाडी हे एक हजार २३० लोकसंख्या असलेले गाव नेहमी स्तुत्य उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. गावकरी ते राव न करी ही म्हण सार्थक करून ग्रामपंचायत, गावकरी, स्थानिक पालक यांनी पुढाकार घेऊन कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली Education In Pandemic जिल्हा परिषद प्राथमिक शाळा Zilla Parishad Primary School शासनाची परवानगी नसली तरी स्वतः च्या जबाबदारीवर सर्व नियमांचे पालन करून औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात पहिली शाळा बुधवारपासून (ता.सात) भरवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांचा किलबिलाटने वर्ग खोल्यात ऐकायल मिळाला. कोरोना महामारीच्या संकटामुळे १६ मार्च २०२० पासून शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.zilla parishad school in ganeshwadi open after one and half year aurangabad updates

school
पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

जे ऑनलाईन शिक्षण चालू आहे ते सर्वच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने आणि गाव, वाडीवस्त्यांवर मोबाईल रेंज उपलब्ध होत नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे विद्यार्थी, पाल्यांचे उज्ज्वल भविष्य दिशाहीन दिसत असल्याने शिक्षक, पालक हवालदिल झाले होते.यातून मार्ग काढण्यासाठी गणेशवाडी येथील स्वच्छ सुंदर, तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त गावाने ता.२५ जून २०२१ रोजी ग्रामपंचायतमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव घेतला. पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे सहमतीपत्र आणि शाळा सुरू करण्यासाठीचे मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी गंगापूर, शिक्षणाधिकारी औरंगाबाद यांना देऊन कोविड- १९चे सर्व शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्याविषयी शपथपत्र देऊन स्वतःच्या जोखमीवर शाळा सुरू करण्याची मान्यता घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले IAS Mangesh Gondawale यांच्याशी चर्चा करून शाळा सुरु करण्याबाबत तोंडी परवानगी घेतली.

school
भागवत कराड! केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास आश्चर्यचकित करणारा

मंगळवारी (ता.६) शाळेतील शिक्षक आणि पाचवी, सहावी, सातवी वर्गातील विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचण्या केल्या. यात कोणीही पॉझिटिव्ह निघाले नाही. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आणि आज बुधवारपासून (ता.सात) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत शाळा सर्व काळजी घेत सुरू झाली. पहिल्या दिवशी ३० विद्यार्थी आले. शाळेच्या गेटवरच ग्रामस्थ, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच पुष्पाताई निरपल, उपसरपंच सुजाता कान्हे, गंगापूर साखर कारखान्याचे माजी संचालक प्रल्हाद निरपल, ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश निरपल, मुख्याध्यापक रजनी केदारे, शिक्षक शरद श्रीखंडे, सुनीता वाघचौरे, सुवर्णा पोटे, संदीप पिसे, अर्चना चांदोडकर, निकस जंजीरे, जया काळे, आप्पासाहेब चित्ते, श्री.कान्हे आदींची उपस्थिती होती. बुधवारी सकाळी तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. वर्ग विद्यार्थ्यांनी गजबजली. आदर्श गणेशवाडी गावाचा हा स्तुत्य उपक्रम पाहून इतर शाळा ही कोविड-१९ ची दक्षता खबरदारी घेत शाळा सुरू करण्यासाठी सरसावल्या जाणार आहेत.

school
Modi Cabinet : भागवत कराडांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

खूप दिवसांनी शाळा सुरु झाली. शाळेत येऊन आनंद वाटले. मोबाईलमध्ये ऑनलाइन अभ्यासास अडचणी येत होती. आता प्रत्यक्ष शिक्षण घेण्यात खूप आनंद आहे. सर खुप छान शिकवितात.

- वेदिका गुंजाळ , विद्यार्थिनी, इयत्ता सातवी

शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ते नुकसान टाळण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

- गोपाळ कान्हे , पालक

विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी हे विषय समजून सांगण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया अपुरी पडते. म्हणून आम्ही गावकरी, शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरु केली.

- पुष्पाताई निरपल, सरपंच, गणेशवाडी

गावाने नेमून दिलेली जबाबदारी शिक्षक सहकारी सर्व प्रकारची काळजी घेऊन करत आहे. इंग्रजी आणि गणित विषय शिकवित आहेत.

- रजनी केदारे , मुख्याध्यापक, गणेशवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()