Sambhaji Nagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता सुरांचे धडे

सातारा, पंढरपूर, पाटोदा, आसेगाव येथील शाळांची प्रयोगासाठी निवड
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आता सुरांचे धडे ऐकायला मिळणार आहेत. प्राथमिक शिक्षण घेता घेता इथले विद्यार्थी गायन व वादन कलेचे शिक्षण घेऊनच बाहेर पडावे. यासाठी संगीत शिक्षकांच्या मदतीने माध्यमातून उदयोन्मुख बालकलाकारांना घडवण्याचा प्रयोग छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने सुरू केला असून जिल्ह्यातील सातारा, पंढरपूर, पाटोदा, आसेगाव ( ता. गंगापूर) या शाळांची निवड झाली आहे.

सध्या जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये संगीत शिक्षण हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी क्लूड ऑन म्युझिका प्रा. लि. बेंगलुरू कर्नाटक या संस्थेच्या माध्यमातून संगीत गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष ठोस कृती कार्यक्रम तयार केला. संस्थेचा GROW WITH MUSIC हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मनोरंजक आणि सर्जनशील पद्धतीने शिकवला जाईल.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : थंडीत विद्यार्थी कुडकुडले

याचा लाभ जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. संगीत शिक्षण विनामूल्य स्वरूपात असून संगीत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. सुभाष शिंदे व सुरेश भुजाडे यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी असून प्रत्येक आठवड्यातील बुधवार व गुरुवार या दिवशी प्रशिक्षण दिले जाईल.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : मारहाणीत मजुराचा मृत्यू

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगीताचे महत्त्व अधोरेखित करत भविष्यातील गुणवान विद्यार्थ्यांसह उत्तम गायक,संगीतकार घडवण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र जिल्हाभरातील जास्तीत जास्त शाळा यात समाविष्ट करून याची व्याप्ती वाढवावी, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली. ग्रामीण भागासाठी ही आनंददायी बाब असून चांगली उपलब्धी आहे. आमच्या आसेगाव शाळेच्या निवडीसाठी आम्ही आभारी आहोत असे जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा आसेगावचे मुख्याध्यापक रावसाहेब थोरात म्हणाले.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून प्रयोग

मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके व गणवेश, स्वच्छ पाणी, स्वतंत्र शौचालय, अनुभवी शिक्षक, दर्जेदार गुणवत्तेसोबतच पोषण आहार, पाठ्यपुस्तके , डिजिटल शाळा, ई लर्निंग यांच्यासह अन्य सोई-सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जातात. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह सर्वात शाळातील उपक्रमशील शिक्षकांचे प्रयत्न पालकांनाही आवडत आहेत. या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांपासून शालेय पोषण आहार देण्यात येतो. सेमी इंग्रजी अभ्यासक्रम, आठवीचे वर्ग सुरू करणे, डिजिटल शाळा, ई लर्निंग असे वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषदांच्या शाळा आपली पटसंख्या टिकवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.