औसा - औसा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. कालचा त्यांचा विजय आणि राज्यात मतदारांनी भाजपला दिलेला उजवा कौल औशासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे..आमदार अभिमन्यू पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील जवळीक संबंध महाराष्ट्राला माहीत आहेत. फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले आणि निष्ठावान म्हणून अभिमन्यू पवारांची ओळख आहे. फडणवीसांच्या चेल्याने विरोधकांसह स्वपक्षातील कांही लोकांनी अडकवलेल्या चक्रव्यूहाला सलग दोनदा भेदून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला..आता दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळविला असल्याने मतदारसंघातील लोकांना देवेंद्र फडणवीस आमदार अभिमन्यू पवारांना नामदार केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास वाटत आहे. कारण औशाला एकदाही मंत्रिपदाची लॉटरी लागली नसल्याने आमदार पवारांचे समर्थक व कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असा लावून बसले आहेत..२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ आपल्या शिष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय शक्ती आणि युक्ती खर्ची करून उद्धव ठाकरे यांच्याकडून सोडवून घेतला. त्यावेळीसही त्यांच्या उमेदवारीला स्वपक्षातील कांही नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला..भूमीपुत्रच उमेदवार असावा यासाठी अभिमन्यू पवारांपुढे अडचणींचा डोंगर उभा केला. एकीकडे दोन वेळेसचे आमदार बसवराज पाटील मजबूत पाय रोवून त्यांच्यापुढे उभे होते तर दुसरीकडून स्वतःच्या पक्षातील लोकं त्यांच्या विरोधात होती. पण त्यांनी हार मानली नाही. मतदारसंघात झंझावाती दौरे काढून लोकांना विश्वासात घेतले. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? याची व्यवस्थित मांडणी केली..तगडी प्रचार यंत्रणा राबवित त्यांनी बलाढ्य बसवराज पाटलांचा सत्तावीस हजारांनी पराभव करीत विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले. पुढे महाविकास अघडीचे सरकार आल्याने अडीच वर्षे त्यांना विरोधात बसावे लागले. कोविड आणि विरोधी पक्षात असतांनाही त्यांनी लोकांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास भरीव विकासकामे करून सार्थ केला. पुढे पक्षफुटीनंतर महायुतीचे सरकार आले..या काळात त्यांनी आपले वजन वापरत मतदारसंघात तीन हजार कोटींच्या वर निधी मंजूर करून घेतला. शेतरस्ते, मनरेगातुन ग्रामसमृद्धी सारखे लोकोपयोगी योजना त्यांनी राबविल्या. शेतरस्त्याचा जनक म्हणून त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा स्वपक्षातील कांहीनी त्यांना टार्गेट करून त्यांच्या अडचणी वाढविल्या..एकीकडे जारांगे फॅक्टर, भाजपावर नाराज मुस्लिम मतदार आणि मराठा मतदारात पडलेली फूट असे समीकरण त्यांच्या अडचणीत भर टाकणारे होते. मात्र त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर लोकांसमोर जात मते मागितली. सर्वधर्मसमभाव हे काय असते हे त्यांनी आपल्या स्वभावातून आणि कामातून दाखवून दिले..त्यामुळे ठाकरे गटाचे दोनवेळा आमदार असलेले दिनकर माने यांचा तब्बल तेहतीस हजार मतांनी पराभव करीत विजयी गुलाल लावला. त्यांच्या कामामुळे आणि राज्यात भाजपला मिळालेले भरघोस यश यामुळे फडणवीस त्यांच्या लाडक्या शिष्याला नक्की मंत्रिमंडळात चांगले स्थान देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील लोकांना आहे. आता फडणवीस शिष्याला किती न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.