शाळांमधून ‘कोरोना’ची जागृती !

file photo
file photo
Updated on

परभणी : जगभर पसरलेल्या धोकादायक अशा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे व कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती करु नका, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.


सध्या नोव्हेल कोरोना विषाणूची लागण जगभरातील  अनेकांना झाली आहे. त्याचा शिरकाव देशासह राज्यातदेखील झाला आहे. या विषाणूची लागण रोखण्यासाठी व ती कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमध्ये याची जनजागृती केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे (उच्च शिक्षा विभाग, स्कुल शिक्षा आणि साक्षरता विभाग)  यांनी देखील याबाबत देशभरातील शिक्षण व्यवस्थेला पत्र देत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देत शाळांना सुचीत करण्यास सांगीतले आहे.

या करा उपाययोजना
वारंवार हात धुने, श्वसन संबंधी शिष्टाचार पाळणे (शिंकताना खोकताना, रुमालाचा वापर करणे), आजारी असताना शाळेत जाणे  टाळणे, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, वारंवार, तोंड, डोळे, नाक यांना हात न लावणे, आजारी व्यक्ती (ताप, सर्दी, खोकला) असणाऱ्यांपासून एक मिटर दूर राहावे, गरज असल्यास त्वरित जवळच्या  स्वास्थ केंद्रास भेट देणे आदीं बाबी सदरचा आजार तसेच अन्य बहुसंख्य संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. या बाबी ज्ञात असणारा युवावर्ग त्यांच्या  कुटुंबामध्ये, समाजामध्ये व त्यापलिकडेही जागृकता निर्माण करणारा प्रतिनिधी ठरू शकतो. त्यासाठी शाळांत विद्यार्थ्यांत जनजागृती केली जाणार आहे.

हेही वाचारान डुकरांच्या कळपामुळे जीप अपघातात अन्...


मास्कची सक्ती नाही
संसर्गजन्य आजाराची साथ सुरु झाल्यानंतर सर्वत्र मास्कची मागणी वाढु लागते. डॉक्टरदेखील मास्कची शिफारस करत असतात. त्यामुळे आताही कोरोनाच्या साथीत सर्वत्र मास्कचा वापर वाढला आहे. परंतू सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कती सक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भिती घालवुन उपाययोजनाकडे लक्ष
राज्य शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांना कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मुलांमधील कोरोनाची भिती घालवुन प्रतिबंधात्मक उपाययोजनाकडे लक्ष दिले जात आहे.
-डॉ. सुचीता पाटेकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) परभणी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.