जगबुडीच्या अफवेने नागरिकांसाठी रात्र काढली जागून

रात्र जागवून काढली.jpg
रात्र जागवून काढली.jpg
Updated on

नांदेड : कोरोना विषाणू रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असताना नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात बुधवारी रात्री जगबुडीची अफवा पसरली. या आपल्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. प्रशासनाने अशा अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. 

अफवेने नागरिक भयभीत
देशासह संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासन प्रशासनाच्या माध्यमातून दिवस-रात्र मेहनत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा आजार रोखण्यासाठी एकविस दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर काहींनी हा आदेश जुमानला नसल्यामुळे पोलीस प्रशासनाला दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. हा आजार पसरू नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन-प्रशासन करत असताना ग्रामीण भागात मात्र एका वेगळ्याच अफवेचे पीक पसरले आहे. 

हेही वाचा....‘खाकी’ची सहायता

जन्मलेले बाळ बोलत आहे 
कंधार तालुक्यात नुकतेच जन्मलेले बाळ बोलत असून जग बुडणार आहे, रात्रीला जागरण करा, बाळ असलेल्या महिलेने पाच घरचे पाणी आणून बाळाला अंघोळ घाला, अशा अफवा पसरून नागरिकांची झोप उडवली आहे. 

रात्र काढली जागुन
या अफवेमुळे अनेक गावातील नागरिक रात्रभर न झोपता जागे राहिल्याचे चित्र बुधवारी रात्री पहावयास मिळाले. या बाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही अफवा आहे, यावर विश्वास ठेवू नका असे सांगत नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला ; परंतु नागरिक मात्र यामुळे भयभीत झाल्याचे दिसून आले. या बाबत जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करुन कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्याची गरज आहे.

नागरिक रस्त्यावर 
झोपल्याने अनर्थ होइल, अशा अफवेमुळे नागरिक मात्र रस्त्यावर येवून चर्चा करत होते. यामुळे प्रशासनाने नागरिकांनी एकत्र येवू नये असे केलेले आवाहन मात्र धुडकावले गेले. अनेकांना त्यांच्या नातेवाइकांचा फोन मध्यरात्री खणानला. त्यांनी आपल्या इतर नातेवाइकांनी तो मॅसेच पुढे पाठवला. यामुळे मध्यरात्री अनेकजन झोपेतुन उठून एकत्र येत चर्चा करताना दिसत होते. यामुळे अनेकांच्या निद्रेचा नाश झाला. या  अफवा पसरविण्यात सर्वच जन होते. शिकले सरवलेल्यांनी कुठलीही खातरजमा अथवा त्यांचे खंडण न करता, त्याला एक प्रकारे प्रोत्साहन देताना दिसत होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.