जालना - महाराष्ट्रातील काही भागात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शाळांना जनजागृती करण्यासह दक्षतेचे आदेश बुधवारी (ता. ११) दिले आहेत, हे विशेष. जिल्ह्यातील शाळांनी जनजागृती करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार कमी करणे वा रोखण्यासाठी राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने उपक्रम हाती घेण्यात याव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. विषाणूची लागण होऊ नये यासाठी, वारंवार हात धुणे, श्वसनासंबंधी दक्षता घेणे, रुमालाचा वापर करणे, टिश्युपेपरचा वापर करणे, आजारी असल्यास विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, गर्दी व सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे, सतत तोंड, डोळे व नाक यांना हात न लावणे अशी दक्षता घेण्यात यावी; तसेच ताप, सर्दी व खोकला असलेल्या व्यक्तीपासून काही अंतरावरूनच संपर्क ठेवावा. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्कची सध्या तरी सक्ती करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस
जिल्ह्यातील शाळांनी युवावर्ग, कुटुंब व समाजात जाणीवपूर्वक जनजागृती करावी, असेही आदेशात म्हटले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांबाबत दक्षता बाळगत जनजागृती करण्यात यावी असेही राज्य शिक्षण आयुक्त पुणे यांनी बुधवारी (ता. ११) विशेष आदेश राज्यातील शाळांना दिले आहेत.
जिल्ह्यातील शाळांनी परिपाठात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. शाळांनी दक्षता बाळगत ‘हात धुवा’ विशेष अभियान राबवावे. शाळांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी, जालना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.