Ram Mandir : अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीसाठी भैरवनाथ साखर कारखान्याने पाठवले 5 हजार लिटर गिरगाईचे तुप

श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध धार्मीक विधी यज्ञ होम हवन होणार आहेत.
ayodhya shri ram pran pratishtha vidhi bhairavnath sugar factory send 5 thousand litre ghee
ayodhya shri ram pran pratishtha vidhi bhairavnath sugar factory send 5 thousand litre gheesakal
Updated on

परंडा - अयोध्या येथे राम जन्मभूमीवर शेकडो वर्षानंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर उभारण्यात येणाऱ्या भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या होम हवन धार्मीक विधीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री व धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ साखर कारखान्याच्यावतीने तब्बल पाच हजार गीर गाईचे तुप पाठवण्यात आले आहे.

श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध धार्मीक विधी यज्ञ होम हवन होणार आहेत. हिन्दूधर्मातील वेदशास्त्रसंपन्न गुरुजी हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विधी करणार आहेत. हिन्दूधर्माच्या कार्यात गाईच्या शुद्ध तुपाला मोठे महत्व आहे.

या ऐतिहासीक धार्मीक कार्यासाठी आपला सहभाग असावा या भावनेतून पालकमंत्री डॉ. तानाजीराव यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील गिरगाईचे पाच हजार लिटर शुद्ध तुप अयोध्येला पाठविण्यात आले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री व भैरवनाथ साखर कारखान्याचे संस्थापक डॉ. तानाजीराव सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक धार्मिक कार्यात भैरवनाथ साखर कारखानाकायम पुढाकार घेत असतो. अनेक वर्षापासून सर्वधर्मीय सामुदायीक विवाहसोहळ्याचे आयोजन केले जाते.

सोनारी येथील श्री. काळ भैरवनाथ यात्रेच्या काळात अन्यछत्र चालविण्यात येते. दुष्काळी परिस्थितीत डोमगाव येथे पर्जन्ययाग् करण्यात आला. ग्रामिण भागात पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले. जनावरांचा चारा देण्यात आला.

ग्रामिण भागासाठी रुग्णवाहिनीची सोय करण्यात आली. कुटूंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक कुटुबीयांना आर्थिक मदत केली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुबियांच्या पाठीशी भैरवनाथ कारखाना व सावंत परिवार कायम उभा राहिला आहे. दिवाळीसाठी घरोघरी साखरेचे वाटप कारखान्याकडून करण्यात येते.

अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गिरगाईचे तुप सेवाभावाने पाठविण्यात आले आहे. त्याचा आनंद असल्याचे भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.