आयुर्वेदातून होईल कोरोनावर उपचार.....कोण म्हणाले ते वाचा

aayourveduc.jpg
aayourveduc.jpg
Updated on

नांदेड : आयुर्वेदामध्ये काही वनौषधी आहेत. या औषधींचा कोरोनावर उपचार म्हणून वापर करता येइल, असे मत डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहीले आहे.

वैदिक काळापासून आयुर्वेदातून वनौषधींचा वापर
कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांचे उपचार करणे म्हणजे धोक्याचे असतानाही डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. चरकसंहिता, अथर्ववेद आणि सुश्रुतसंहितेत या नीरब्राह्मीचा उल्लेख ब्राह्मी असा केला गेला असल्यामुळे तिला देखील ब्राह्मी म्हटले जाते. 

चरक व सुश्रुत कालखंड वनौषधींचा सुवर्णकाळ 
प्राचीन काळात वेदांचा अभ्यास करणारे अभ्यासक स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्राह्मी या वनस्पतीचा वापर करीत, असा उल्लेख आहे. तिच्या सेवनाने मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि कंपवाताच्या (पार्किनसन) विकारांसारखे विकार टाळता येऊ शकतात, असे काही संशोधनांतून निदर्शनास आले आहे. औषधी वनस्पती आहेत, याचे त्याला ज्ञान झाले. भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या  वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे. 

चरकसंहितेमध्ये सातशेच्यावर औषधी
चरकसंहितेमध्ये सातशेच्यावर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. त्यामध्ये ब्राम्ही, जटामांसी, आम्लकी, अश्वगंधा, वचा, शंखपुष्पी या औषधांच्या संयुक्त मिश्रणाने मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि कुठलेही विषाणू शरीरात प्रवेश करू नये यासाठी प्रतिकार करीत असतात. अश्वगंधा या औषधाने मानसिक तणाव दूर करण्यासाठी मदत होते. आम्लकी या औषधाने सर्दी, खोकला सारख्या रोगावर प्रभावी औषध म्हणून वापर करता येतो. ब्राम्ही या वनस्पतीत भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतो आणि कर्करोग सारख्या पेशींना नष्ट करण्याचा काम करते. 

कोरोनाग्रस्त रुग्णांवर होईल उपचार
आयुर्वेदिक मतानुसार जटामांसी मधुर, पाचक असते.  यासोबतच यह कुष्ठ, रक्तविकार, त्वचा रोग, ज्वर, अरुचि, दाह, आंतों की सूजन, मूत्र रोग, रक्ताभिसरण क्रियाची खराबी, पीलिया खूप गुणकारी औषध आहे. वचा हे छातीतील खरकरपणा, श्वास घेण्यास त्रास, यकृतात जळजळपणा, खोकला कमी करण्यास मदत करतो. श्वासनक्रियाच्या ऍलर्जी आजारही कमी करण्यास मदत करतो. मानसिक दुर्भलता सोबतच शारीरिक अशक्तपणा दूर करण्यास शंखपुष्पी मदत करते. अशाप्रकारचे औषधी गुण आहेत, त्या औषधींचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास असल्याचे डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.