फुलंब्री - शासनाने शासन निर्णय काढून फुलंब्री तालुक्यातील चार महसूल मंडळाचा दुष्काळ सदृश्य परिस्थितीत समावेश केला आहे. मात्र यात बाबरा महसूल मंडळाला यातून वगळण्यात आल्याने आमदार हरिभाऊ बागडे यांनी या भागातील खरीपातील पिकाची पाहणी करून बाबरा महसूल मंडळालाही दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या सवलती द्या अशा सूचना तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना दिल्या.
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, पिरबावडा, आळंद आणि फुलंब्री या चार महसूल मंडळाचा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा शासन निर्णय शासनाने काढला. मात्र यात फुलंब्री तालुक्यातील बाबरा महसूल मंडळाला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे बाबरा येथील महसूल मंडळात असणाऱ्या खरिपातील पिकाची आमदार हरिभाऊ बागडे यांनी अधिकाऱ्यासह पाहणी केली.
तहसीलदार डॉ.कृष्णा कानगुले यांना बाबरा महसूल मंडळालाही दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या सवलती द्या अशा सूचना केल्या. बाबरा महसूल मंडळातील बाबरा, हिवरा, सोनेरी, पोखरी या गावातील व मंडळातील विविध ठिकाणी खरिपातील पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, बाबरा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल, गटविकास अधिकारी विनायक राठोड, कृषी विभागाचे श्री. जीवरग, मंडळ अधिकारी श्री. खरे, तलाठी थोरात, विकास गायकवाड, मिनाजोद्दीन शेख,रामकृष्ण मैंद, धनंजय महाजन, माधवराव काळे, प्रवीण वाघ, विश्वास चव्हाण, मनोहर काळे, हरिदास पवार, संजय पवार, अप्पाराव पवार, घनश्याम शिंदे, सुधीर सोनवणे, भाऊसाहेब पवार, शिवाजी वाघमारे, हरिकीसन दणके, अशोक पांडे, शरद दाभाडे, सतीश काळे, विठ्ठल राजपूत, विठ्ठल पाथ्रे, दगडू मोरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.