नांदेड : मार्च महिण्यात अनेक बँकांचे हिशोब किताब, वर्षाची ताळेबंदीची घाई गडबड सुरु असते. किंबहुना अनेक बँका फेब्रुवारी पासूनच कर्ज प्रक्रिया थांबवितात. संपूर्ण मार्च महिना त्यांची लगीनघाई सुरु असते. परंतू याच महिण्यात सलग आठ दिवस बँक बंद राहणार असल्याने बँकेतील एकही कागद किंवा फाईल पुढे सकणार नसल्याची सांगण्यात येत आहे.
मार्च महिण्यातील या बंदमुळे सामान्य ग्राहकांची चांगलीच तरांबळ उडणार आहे. बँक बंद दरम्यानचे आत्ताच नियोजन केल्यास अनेकांना या मनःस्तापासून सुटका मिळु शकते. तेव्हा तुम्ही नियोजन कसे करणार आहात यावर सर्व काही अवलंबून आहे. याविषयी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आठ ते १५ मार्च दरम्यान बँकेचे काम पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
हेही वाचा- बांधकाम मंत्री अशोक चव्हाणाकडून विद्यार्थ्यांसाठी ही खुश खबर
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात असा आहे बंद
मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात आठ मार्चला रविवारची सुट्टी, सोमवारी होळी, १० तारखेला धुळीवंदन तर ११ ते १५ मार्च दरम्यान विविध बँक कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्या मान्य करुन घेण्यासाठी तीन दिवस संपावर जाणार असल्याचे संकेत बँक कर्मचारी संघटनेकडून मिळत आहे. तर १४ तारीखेला दुसरा शनिवार आणि १५ तारखेला पुन्हा रविवार असल्याने सलग आठ दिवस बँकेला सुट्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना चेक वठवण्यापासून ते नगदी व्यवहार करण्यापर्यंत अनेक आडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा- तूर विकण्यासाठी ‘जात’ सांगण्याची गरज काय ?
सामान्य ग्राहकांची कोंडी होण्याची शक्यता
असे असले तरी, युनियन बँक कर्मचारी फेडरेशन आॅफ इंडिया (BEFI) व आॅल इंडिया बँक कर्मचारी असोसिएशन (AIBEA) कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी २८ तारखेला वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच स्ट्राईक करायचा किंवा नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. स्ट्राईकमुळे बॅंका आठ दिवस बंद राहिल्यास लघु उद्योजक, व्यापारी, रोजंदारी करणाऱ्या ग्राहकांना देखील व्यवहार करणाऱ्या ग्राहकाना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे- नांदेड जिल्ह्यात पुन्हा एका बालिकेवर अत्याचार
असे करा नियोजन
सध्या अनेक ठिकाणी पेटीएम, स्वाईप मशीन, आॅनलाईन पेमेंट आणि डेबिट - क्रेडीट कार्डद्वारे पैशांची देवाण घेवाण सुरु आहे. त्यामुळे बँकानी देखील खात्यातुन रक्कम काढण्यासाठी काही मर्यादा घातल्या आहेत. आॅनलाईन व्यवहारावर भर दिला जात असला तरी, आजही छोटे किराणा दुकान, फळभाज्या खरेदीसाठी बाजारात गेल्यास त्या ठिकाणी नगदी व्यवहार करावा लागतो. तेव्हा अशा वेळी आपल्या खिशात सुट्टे पैसे असणे गरजेचे आहे. अन्यथा निराशा होऊ शकते. म्हणून पुढील महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यातील सुट्यांची शक्यता बघता आत्तापासूनच नियोजन करावे लागणार आहे. रोजचा घर खर्चाचा आंदाज घेऊन त्या दृष्टिने आत्तापासून खात्यातून रक्कम काढून ठेवल्यास हवे त्या वेळी त्या पैशांचा वापर करता येऊ शकतो.
|