कन्नड - बारामती ॲग्रो साखर कारखाना (ता. 16) दुपारी दीड वाजता अनोळखी व्यक्तीने अचानक प्रवेश करून इमर्जन्सी बटन दाबून कारखाना बंद पाडला. त्यामुळे कामगार, व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सांगितले की, कन्नड पोलीस ठाण्यात बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी विनोद खिलोबा निरुटे यांनी फिर्याद दिली की, बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरू आहे. (ता. 16) दुपारी दीड वाजताच्या सुमारास कारखाना अचानक बंद पडला.
त्यामुळे कामगार आणि व्यवस्थापनात खळबळ उडाली. कारखाना सुरक्षा अधिकारी विनोद निरुटे यांनी इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी, साजिद मोहम्मद जमादार यांना या घटनेची माहिती दिली असता ते तात्काळ कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता एक अनोळखी इसम काटा गेटच्या बाजूने अनधिकृत प्रवेश करताना दिसून आला.
सीसीटीव्ही फुटेजची अधिक तपासणी केली असता सदरील इसम इलेक्ट्रिक विभागाच्या कंट्रोल रूम मध्ये जाऊन इमर्जन्सी बटन दाबताना दिसून आला. त्यामुळे संपूर्ण कारखाना ठप्प झाला. सदरील इसम दीपक एकनाथ धनेधर राहणार माळीवाडा, कन्नड येथील असल्याचे दिसून आले.
सुरक्षा अधिकारी निरुटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक एकनाथ धनगर यांच्याविरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात कलम 448, 287, 427 भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश खेडकर, वर्षा चेळेकर, व्ही. एम. पवार हे करत आहेत.
कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे अनोळखी इसमाने हा कारखाना अचानक बंद पाडला. त्याच्या कारणाचा शोध घेण्याची गरज आहे. सदरील इसम याला कारखान्याची ईत्यंभूत माहिती दिसते. कारण हा इसम कारखान्याच्या इलेक्ट्रिक विभागात जातो व तेथील नेमके इमर्जन्सी बटन दाबून कारखाना बंद पडतो.
कारखान्यामध्ये सध्या दीडशेच्या वर कर्मचारी कार्यरत आहेत. एका तासाला 280 टन साखर उत्पादन या कारखान्यात होते. कारखाना व्यवस्थापनाने जलद गतीने हालचाली करून पुढील खबरदारी घेतली नसती तर टर्बाइनचा स्फोट होऊन कारखान्यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
- मिलिंद देशमुख, कारखाना व्यवस्थापक, बारामती ॲग्रो साखर कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.