बीड/अंबाजोगाई: कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत दहा दिवसांपासून घट होत (recovery rate) असल्याने आता बीडचे सिव्हिल आणि अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालयात बेड रिकामे होऊ लागले आहेत. सोमवारीही (ता. २४) जिल्ह्यात ८२४ रुग्ण आढळले तर ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave covid 19) सुरुवातीला रोज ५० च्या वर रुग्णांनी सुरुवात झाली आणि २० एप्रिलला हा आकडा हजारांच्या पुढे गेला. मे च्या सुरुवातीला तर कहर झाला आणि तब्बल १५२० रुग्णांची नोंद झाली. नंतर आकड्यांत काहीशी घसरण झाली. पण, खरी घसरण सुरु व्हायला २० मे उजाडावा लागला. दरम्यान, या काळात अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच बीडच्या जिल्हा रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी रुग्ण व नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागत होती. अगदी सिव्हिलमधील खाटा २६० वरून ७४० करुनही क्षमता अपुरी पडू लागल्याने तातडीने आयटीआयमध्ये सिव्हिल अंतर्गतच २३४ खाटांचे ओटू यंत्रणा असलेले रुग्णालय उभारले गेले. तर, स्वारातीमध्येही २५० वरून ४०२ खाटा वाढविण्यात आल्या होत्या.
तरीही रुग्णांना कॅज्युअल्टीमध्ये ओटू लावून ठेवावे लागे. परंतु, आता दहा दिवसांपासून रुग्णसंख्येत बऱ्यापैकी घट आणि कोरोनामुक्तांचा आकडा वाढल्याने या दोन्ही प्रमुख संस्थांमध्ये ओटू, बायपॅपचे बेड व्हॅकंट आहेत. सिव्हिलमध्ये तब्बल ३१३ खाटा शिल्लक असून यामध्ये २५० ओटू यंत्रणा असलेल्या खाटाही शिल्लक आहेत. तर, जिल्हाभरात सात हजारांवर खाटा शिल्लक आहेत.
अंबाजोगाईकरांनाही दिलासा; स्वारातीची कॅज्युअल्टी रिकामी
अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे कोविड सेंटरमधील बेड झपाट्याने रिकामे होत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शहरातील वातावरण पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. सोमवार (ता.२४) तालुक्यात ५७ रुग्ण आणि शहरात २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये अनेक बेड रिकामे आढळले. रूग्णालयात ऑक्सिजन बेड २७ शिल्लक आहेत. विना ऑक्सिजनचे ५२ बेड रिकामे झाले. व्हेंटिलेटरचे दोन बेड रिकामे आहेत.
८२४ नवे रुग्ण; ८६८ कोरोनामुक्त-
सोमवारी तब्बल ६५२९ लोकांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल हाती आले. यामध्ये ५७०५ लोकांचे अहवाल निगेटिव्ह तर ८२४ लोकांना कोरोना असल्याचे निदान झाले. मात्र, याच दिवशी ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्याची रुग्णसंख्या ८२ हजार ४३ झाली असून आतापर्यंत ७१ हजार ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्याही चार हजारांनी घटली आहे. सोमवारी २६६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ३१२ रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत होते. तर, ५६९९ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते. मागील २४ तासांत १६ नवीन मृत्यूंची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८७७ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.