बीड : दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या प्रवाहीत झाल्याने तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. साेमवार ते मंगळवार या २४ तासांत आणखी नऊ प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले. .सध्या जिल्ह्यातील ११ मध्यम प्रकल्पांसह ६४ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. या पाण्यामुळे पुढील वर्षाची पिण्याच्या पाण्याची चिंता पूर्ण मिटली आहे. तलावांमध्ये सध्या ३६६.३६१ दलघमी पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची टक्केवारी ४७.७२ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात माजलगाव धरणासह एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत. यातील ११ प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग आता ५०० क्युसेक्सने वाढल्याने माजलगाव धरणातील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. .सध्या २४ लघू ्रपकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. मात्र, इतर ११ मध्यम व ६४ लघू प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११५ टक्के पाऊस झाला आहे.माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. धरण आता मृतसाठ्याबाहेर येऊन २१ टक्के पाणी साठा झाला आहे. या धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून असतात. .परंतु धरण कार्यक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे हे धरण मृतसाठ्यातच होते. मागील दोन दिवसापासून धरण कार्यक्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे धरणामध्ये २१ टक्के उपयुक्त पाण्यासाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या तीन हजार नऊशे क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास माजलगाव धरण लवकरच भरेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. माजलगाव धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत असल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. .बीड व परभणीतील गावांनाही त्यामुळे दिलासा मिळणार आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा बघण्यासाठी शहरवासीय गर्दी करतात. परंतु या ठिकाणी असलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. याठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचणी निर्माण होतात, त्यामुळे लक्ष देण्याची गरज आहे.माजलगाव धरण पाणी पातळी क्षमता ४३१.९० मिटरसध्याची पाणी पातळी ४२७.७६ मिटरउपयुक्त पाणीसाठा २१ %पाण्याची आवक - तीन हजार नऊशे क्युसेक..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.