Beed Crime: बीडचा बिहार होतोय का? नीटनंतर महादेव बेटिंग ॲपचे बीड कनेक्शन...

Mahadev Betting App: ही घटनांची मालिका बीड जिल्ह्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विविध गैरव्यवहार आणि गुन्हेगारी प्रकरणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mahadev Betting App news
Mahadev Betting App newsesakal
Updated on

बीडमध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सायबर पोलिसांनी शहरातील जालना रोडवरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीकडून विविध बँकांचे 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक, 100 चेकबुक आणि 25 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. संशयित रूपेश गंगाधर साखरे (रा. टेंभुर्णी, घाटशीळ पारगाव, ता. शिरूर) हे महादेव ॲपवर ऑनलाइन सट्टा चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक करून न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आणखी चार ते पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

नीट परीक्षेतील गैरव्यवहार-

नीट परीक्षेमध्ये बिहारमधील पाटण्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे सापडत आहेत. CBI ने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर नीटसह अन्य परीक्षांमध्येही गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या 3 व्यक्तींवर CBI संशय असून, त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे यांचे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.

भूखंड हडपण्याचे प्रकार-

बीड जिल्ह्यात भूखंड हडपण्याचे प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मूळ मालकाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये उभे करून त्याचे बनावट आधार कार्ड व भूखंडाचे खोटी कागदपत्रे तयार करून रजिस्ट्रेशन केल्याचे प्रकार समोर आले आहेत. शेख रियाज मोईजोद्दीन यांनी याबाबत तक्रार दिली असून, अभिनाथ वसवकर यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Mahadev Betting App news
Rohit Sharma Video: 'अजून तरी तुम्ही...' रोहितने वनडे-कसोटी निवृत्तीबद्दल स्पष्टच दिलं उत्तर

परळीत गोळीबार प्रकरण-

बीडमधील परळीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. शरद पवार गटाचे बबन गीते यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन गीते यांनी पैशाच्या वादातून बापू आंधळे यांच्यावर गोळीबार केला असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

ही घटनांची मालिका बीड जिल्ह्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विविध गैरव्यवहार आणि गुन्हेगारी प्रकरणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनांचा तपास जलदगतीने करून दोषींना कडक शिक्षा दिल्यास परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.

Mahadev Betting App news
Ajit Pawar : अजित पवार गटाचं ठरलं...कोणत्या जागांवर करणार दावा? 288 जागांच्या सर्व्हेची तयारी! भाजप-शिवसेनेच्या चिंतेत वाढ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.