बीड : गुत्तेदारांची दिरंगाई शेतकऱ्यांच्या मुळावर

जलसंधारणाची निविदा निघालेली १६ कोटीची २५ कामे रद्द; दहा वर्ष होऊनही झाली नाही अनेक कामे
 Water conservation tendered
Water conservation tendered sakal
Updated on

बीड : शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी शासन कोट्यवधींचा निधी मंजूर करते परंतु; कामाच्या निविदा निघूनही केवळ गुत्तेदारांच्या वेळकाढू धोरणामुळे मंजूर केलेली कामेच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल १६ कोटी सात लाख ८१ हजारांची २५ कामे जलसंधारण विभागाने रद्द केली आहेत. यात पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे यासारख्या कामांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हे घोषवाक्य घेऊन शासन जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभर कोट्यवधींच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनेतून भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठीही मोठा उपयोग होत आहे. बीड जिल्हा अगोदरच सिंचनाच्या अनुशेषापासून कोसो दूर असताना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष अद्याप ३० टक्क्यांपर्यंतही पोचला नाही. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी नवीन निधी मिळाला नसला तरी, चार-पाच वर्षांपूर्वी जलसंधारणाच्या ज्या कामांना निधी मिळून निविदाही निघाल्या होत्या तिच कामे गुत्तेदारांनी वेळेवर सुरु केली नाहीत.

निविदा निघून, करारपत्र होऊनही गुत्तेदारांनी जी कामे केली नाहीत ती कामे जलसंधारण महामंडळांनी रद्द केली असून तसे आदेश जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.एम. परांडे यांनी काढले आहेत. यात पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे यासारख्या कामांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

४० वर्षांपासून मागणी केलेले कामही रद्द

शिरूर तालुक्यातील कोळवाडी येथील सिंदफणा नदीवरील बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थ मागील ४० वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याचे हे काम जानेवारी २०१९ मध्ये मंजूर करण्यात आले होते. दोन कोटी चार लाख रुपयांची निविदा काढून हे काम जालना येथील कंत्राटदार एम.ए. अंभुरे यांना मिळाले होते. परंतु दिरंगाईमुळे हे कामही रद्द झाले आहे.

लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा नाही

आपल्या मतदारसंघात कोणती कामे आली आहेत, त्याच्या निविदा कधी निघाल्या, काम सुरु झाले का नाही याबाबत पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याने ही नामुष्की ओढवल्याचे दिसून येते. वेळेवर पाठपुरावा करून कंत्राटदाराच्या तक्रारी केल्या असत्या तर, ही वेळ आली नसती अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.

जलसंधारणाची ही कामे झाली रद्द

  • धारूर तालुका : बांगरवाडी (मैदवाडी) क्र.२, कासारी क्र.३, बोडखा क्र.२ येथील पाझर तलाव. चोरंबा येथील साठवण तलाव (एकूण किंमत एक कोटी ९१ लाख २४ हजार).

  • पाटोदा तालुका : डोंगरकिन्ही, नायगाव, वाघीरा, पिंपळवंडी, धनगरवळका, गंडाळवाडी, वर्णी, महासांगवी, येवलवाडी क्र.२, क्र.३, येथील चार कामे. (एकूण किंमत तीन कोटी ७६ लाख ९१ हजार)

  • शिरूर तालुका : भडकेल क्र.२, कोळवाडी, शिरूर, शिरापूर क्र.१, खालापुरी. (एकूण किंमत सात कोटी ५३ लाख).

  • वडवणी : ढेकणमोहा (एकूण किंमत ४७ लाख ९८ हजार)

  • बीड तालुका : वांगी (एकूण किंमत एक कोटी ५२ लाख

    ९६ हजार)

  • अंबाजोगाई तालुका : चिंचखंडी (एकूण किंमत ४५ लाख

    १३ हजार)

  • आष्टी तालुका : पांडेगाव (एकूण किंमत ४० लाख ५९ हजार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.