latest Beed News: वर्षी पावसाअभावी शेतक-यांचे नगदी कपाशी,सोयाबीनचे उत्पन्न कमालीने घटले.शिवाय दर ही समाधान कारक मिळाला नाही.यामुळेच सरकारने या दोन्ही पिकाला प्रती हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली.मात्र, घोषणा करुन देखील मोठा कालावधी झाला तरी अनुदानास शासनाकडून'तारीख पे तारीख'सुरु केल्याने बीडच्या गेवराईतील साधारण एक लाखाहून अधिक शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतक-यांना आर्थिक हातभार लावत असलेली गतवर्षी कपाशी,सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर पावसाअभावी मोठा परिणाम झाला. त्यातच सोयाबीनचे ४ हजार २०० तर कापसाचे ६ हजार ८०० ते ७ हजार २०० च्या पुढे दर सरकलेच नाही.मात्र, शेतक-यांच्या घरातील कापुस विक्री होताच भावात थोडी सुधारणा झाली.