Beed Crime News : 'फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावाखाली माजी मंत्र्याच्या भावाला फसवलं; बीड पोलिसांनी 'असा' लावला छडा...

Beed Kshirsagar News : 10 नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी 40 हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे १५ नोव्हेंबरला 45 हजार 200 रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे त्यांना यावर विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले...
Beed Kshirsagar News
Beed Kshirsagar Newsesakal
Updated on

बीडः फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचं आमिष दाखवून 57 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. या प्रकरणी बीड पोलिसांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

नेमकी घटना काय?

डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साईट पहात होते. यातील एका साईटवर त्यांनी रिप्लाय दिला. त्यावरून त्यांना टेलीग्राम आयडी देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. 5 ते 7 दिवस समोरील अर्पिता मोनिका नामक व्यक्तीशी त्यांचे मेसेजवर बोलणे झाले. यावेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का? असा सवाल केला. यावर डॉ. क्षीरसागर यांनी होकार दिला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली.

Beed Kshirsagar News
Nana Patole : विधानसभा निवडणुकीबाबत नाना पटोलेंची मोठी घोषणा; म्हणाले, 'मविआ'च्या नावावर आम्ही..

अशी केली गुंतवणूक

10 नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी 40 हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे १५ नोव्हेंबरला 45 हजार 200 रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे त्यांना यावर विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. 57 लाख 20 हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला 36 लाख रूपये टॅक्स बसला आहे. तो भरा, असे सांगितले. परंतु डॉ. क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा, असा आग्रह धरला.

फसवणूक झाल्याचं आलं लक्षात...

त्यानंतर क्षीरसागर यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी 5 जानेवारी 2024 रोजी त्यांनी तात्काळ बीड सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता हे भामटे बिहारमधील असल्याचे समजले. त्यानंतर बीड पोलिसांनी बिहारमध्ये जावून, या 5 भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Beed Kshirsagar News
MS Dhoni Birthday: धोनीने पत्नीबरोबर केला वाढदिवस साजरा, साक्षीने नमस्कार करत आशीर्वादही घेतले, पाहा Video

विठ्ठल क्षीरसागर हे स्वतः डॉक्टर असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ते भाऊ आहेत. बीड सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर 5 जणांना बिहारमध्ये जाऊन ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.