परळी वैजनाथ (बातमीदार) : शहरात पतीच्या मित्राने तीन वर्षे अत्याचार करुन साडेआठ लाख रुपये उकळल्याची घटना गुरुवारी (ता.आठ) उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. येथील शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे ३३ वर्षीय पीडित महिला कुटुंबीयासह राहते. महिलेच्या पतीचा मित्र यांच्या घरी नेहमी ये-जा करत असे. यातून त्याच्याशी ओळख झाली. त्याने महिलेला धमकावून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर विश्वास संपादन करुन आठ लाख रुपये नगदी व साठ हजार रुपये किमतीच्या दोन तोळ्याच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख ६० हजार रुपये उकळले. ते परत मागितल्यावर पीडितेला काठीने मारहाण करुन धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन (रा.बडवणी ता.गंगाखेड जि.परभणी) याच्यावर बुधवारी (ता.सात) रात्री येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक अशोक खरात हे करत आहेत.
संपादन - गणेश पिटेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.