Beed Crime : बीडमध्ये महिलेचा विनयभंग; हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी दिला चोप

आसोला येथील घटना, ग्रामस्थांकडून चोप
Molestation crime
Molestation crimeesakal
Updated on

बीड/धारूर - किल्ले धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत आसोला (ता. धारूर) येथे एका महिलेचा घरी जाऊन तिचा विनयभंग केला. ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. धारूर पोलिस ठाण्यात संशयित हवालदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्याला निलंबित केले. संजय गुंड असे या हवालदाराचे नाव आहे.

Molestation crime
Hingoli : ट्रॅव्हल बसवर दगडफेक; मात्र सुदैवाने बस मधील तीस ते चाळीस प्रवासी सुखरूप

हवालदार संजय गुंड याने सोमवारी (ता. ३१) रात्री उशिरा हे कृत्य केले. ग्रामस्थांनी चोप देऊन त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित महिलेचे नातेवाईक आज सकाळी हवालदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात आले, परंतु धारूर पोलिसांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रयत्न केले.

Molestation crime
Hingoli crime : भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार

नातेवाईक ठाम राहिल्याने आणि पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाई झाली. गुन्हा नोंद झाल्यानंतर ठाकूर यांनी गुंड याला निलंबित केले. दरम्यान, आक्रमक भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांसोबत धारूर पोलिस ठाण्यातील काहींनी अरेरावीचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()