Beed: बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला

Latest Ambejogai News:खचलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे
 बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला
Beedsakal
Updated on

Latest Marathwada News: अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा-देवळा रस्तावर कोपरा शिवारात ओढ्याच्या पुलावर एक ठिकाणी मोठे भगदाड पडले असून देवळा शिवारात रस्ता खचला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. रस्ता खचून दोन महिने झाले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्ती करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.

धानोरा-देवळा रस्ता हा मोठ्या रहदारीचा आहे. परिसरात जून महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसाच्या पाण्याने नदी नाले ओढे ओसंडून वाहिले होते. धानोरा- देवळा रस्त्यावर दोन ठिकाणी ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहिल्याने दोन ठिकाणी रस्ता खचला आहे.

 बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला
Beed News: महसूल व वाहतूक शाखेची मोठी कारवाई, लोकेशन देणाऱ्या वाहनासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी धोकादायक रस्ता आहे, असे वाहन चालकांना लक्षात यावे म्हणून शेजारील शेतकऱ्याने काटेरी झाडाच्या फांद्या आणि दगड लावण्याचे काम केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना स्थानिकांना रस्ता खचलेला माहिती आहे, परंतु नवीन प्रवासी वाहन आल्यास त्यांच्या लक्षात न आल्यास अपघात घडू शकतो. दोन महिने होत आले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. खचलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे

 बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला
Beed Success Story: अथक परिश्रम करुन ऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक

धानोरा देवळा रस्ता खचल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे .वाहन चालकांना जवळ जाईपर्यंत हा रस्ता खचला आहे असे लक्षात येत नाही .रात्री या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे .या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.

- सिद्धेश्वर साबळे, धानोरा खुर्द, ता.अंबाजोगाई

 बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला
Beed Water News: जिल्ह्यात ७५ टक्के पाऊस, धरणांमध्ये मात्र १५ टक्केच पाणीसाठा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.