बीड : जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ चा आढावा उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.१०) ऑनलाइन पद्धतीने घेतला.पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे मुंबईहून सहभागी झाले होते. बीड येथून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.
सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते. ऑनलाइन बैठकीत जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले. पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०२३- २४ अंतर्गत ४१० कोटी मंजूर असून, २८७ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यापैकी २१९ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
१४५ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, ३९ कोटी ३९ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०२४- २५ साठी ४०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा सादर केला. तसेच जिल्ह्याच्या विविध योजनांसाठी १४० कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्यासाठी जास्तीत- जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे वित्तमंत्री श्री. पवार यांनी आश्वासन दिले. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नारायणगड व गहिनीनाथगड येथील मंजूर कामांवरील निधी उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विनंती करण्यात आली.
अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांनी वर्ष २०२२-२३ अंतर्गत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता संपूर्णपणे संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याबाबत निर्देश दिले. वडवणी तालुक्याचा आकांक्षित तालुक्यामध्ये सामावेश करण्यात आला असल्याने त्यास विशेष निधी मंजूर करण्यात येईल व मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.