Beed Politics : पंकजा मुंडेंना धोका देत सगळी यंत्रणा सोनवणेंना! बीड जिल्हाप्रमुखाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

लोकसभा निवडणूक जेवढी रंगतदार झाली त्याहून अधिक एकेक रोचक बाबी आता समोर येत आहेत. निवडणुकीत मातब्बर नेत्यांची फौज सोबत असूनही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
Beed Politics
Beed Politicssakal
Updated on

बीड : लोकसभा निवडणूक जेवढी रंगतदार झाली त्याहून अधिक एकेक रोचक बाबी आता समोर येत आहेत. निवडणुकीत मातब्बर नेत्यांची फौज सोबत असूनही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. महायुतीतीलच प्रमुख घटक पक्षाचा एक जिल्हाप्रमुख आपण आयुष्यात प्रथमच पंकजा मुंडेंना धोका देत असल्याचे म्हणत असल्याची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.

‘आपल्या गावात आपण मुंडेंना काही प्रमाणात मताधिक्य देणार आहोत. कारण, भविष्यात आपल्याला विधानसभेला सर्वांचे मतदान हवे आहे. मात्र, बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व ३७६ बूथवरील यंत्रणा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना देत आहोत’ असे यात म्हटले आहे. या संभाषणावरून ही कॉल रेकॉर्डिंग मतदानापूर्वीची असल्याचा अंदाज आहे.

पंकजा मुंडेंसोबत असलेल्या काही बड्या नेत्यांचे मतदारांनी ऐकले नाही तर काहींनी सोबत राहून विश्वासघात केल्याचे यावरून दिसत आहे. कॉल रेकॉर्डिंगच्या या दोन क्लिपपैकी दुसऱ्या क्लिपमध्ये सदर पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करत असल्याचे समोरच्याला बोलत असून, ‘आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लावू, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो’ असे दावे करत आहे. ‘आपण थेट अंगावर जाऊ, धनंजय मुंडेंची गाडी फोडू, कोणाला घाबरत नाही’, असेही हा पदाधिकारी बोलत आहे. दरम्यान, कथितरीत्या शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्‍हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ही क्लिप असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.