बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रीयेला गोंधळ, भांडणाचे गालबोट लागले. मतदानाची अंमित आकडेवारी जाहीर करायला प्रशासनाला उशिर लागला. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा साधारण तीन टक्के मतदान अधिक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..यंदा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदान संघात सरासरी ६७.३४ टक्क्यांच्या पुढे मतदान नोंद झाले आहे.जिल्ह्यातील बीडसह गेवराई, आष्टी, माजलगाव, परळी व केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रीया पार पडली. थंडीचा हंगाम असल्याने सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का कमी दिसून आला. दुपारनंतर मात्र मतदानाची टक्केवारी वाढली. परळी व केज मतदारसंघात सरळ तर उर्वरित चार मतदार संघात बहुरंगी लढती झाल्या. माजलगाव मतदार संघात सर्वाधिक ३४ उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर तीन मतदान यंत्र वापरावे लागले. तर, बीडमध्येही ३१ उमेदवार रिंगणात होते. यंदा प्रमुख महायुतीसह महाविकास आघाडी या दोन पक्षांसह अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली आणि निकालाचे अंदाज बांधणेही कठीण केले आहे..मागच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढला टक्कामागच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६४.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. बुधवारी झालेल्या मतदानात हा आकडा ६७ टक्क्यांहून पुढे गेल्याचा अंदाज आहे. बीड मतदार संघात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत सात टक्के मतदान कमी झाले आहे. मागच्या निवडणुकीत बीडमध्ये ६५.८४ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र ५८.३३ टक्के मतदान झाले आहे. माजलगाव मतदार संघात देखील मागच्या निवडणुकीत ६९.१५ टक्क्यांवरुन यंदा ६७.२६ टक्के मतदान झाले.आष्टी मतदारसंघात मात्र मतदानाचा आकडा ६४.६९ टक्क्यांवरुन ७०.८९ टक्क्यांवर गेला आहे. परळी मतदारसंघातील मतदान मागच्या वर्षीच्या तुलनेत सारखेच आहे. मात्र, केज मतदार संघात मागच्या निवडणुकीत ६३.६८ टक्क्यावरुन यंदा ७० टक्क्यांवर मतदान पोचले आहे..गेवराई मतदार संघातही मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झाले आहे. मागच्या निवडणुकीत ७४ टक्के असलेला मतदानाचा आकडा यंदा ७१.२३ टक्क्यांवर खाली आला.घाटनांदूरला उशिरापर्यंत मतदानदरम्यान, परळी मतदार संघातील घाटनांदूर (ता. अंबाजाेगाई) मतदान केंद्रात मशिनसह साहित्याच्या तोडफोडीमुळे काही काळ मतदान प्रक्रीया थांबविण्यात आली. त्यानंतर प्रक्रीया सुरु झाल्यानंतर मतदारांनी पुन्हा रांगा लावून मतदान केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे मतदान झाले.स्थलांतरित मजूर आणल्याने टक्का राखलादरम्यान, जिल्ह्यातून दोन लाखांवर ऊसतोड मजूर राज्यातील विविध कारखान्यांसह कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांत देखील स्थलांतर करतात. दसरा ते दिवाळी असा दरवर्षी स्थलांतराचा हंगाम असतो. यंदा विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरु झालेले नाही..मात्र, तरीही राज्यातील काही कारखान्यांसह कर्नाटक राज्यात मजूर स्थलांतरीत झाले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर मजूर जिल्ह्यातही होते. तरीही प्रमुख उमेदवारांनी विजयाचे गणित जुळविण्यासाठी स्वत:चे आर्थिक गणित बिघडवत मजूरांना मतदानासाठी आणले. त्यामुळे मतदानाचा टक्का राखला गेला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.