बीड जिल्ह्यात हनीट्रॅप; विटभट्टीचालकाला दहा लाखांची मागणी

honey trap 4.jpg
honey trap 4.jpg
Updated on

नेकनूर (जि. बीड) : बीड जिल्ह्यात हनीट्रॅपचा प्रकार उघड झाला आहे. विटभट्टी चालकाला या प्रकारात अडकवून ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. केज, मांजरसुंबा व आष्टी या तीन ठिकाणी मागच्या दोन दिवसांत ही घटना घडली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 
केज तालुक्यातील टाकळी येथील विटभट्टी चालकास भ्रमणध्वनीवरून तुमच्याकडून विट खरेदी करायची आहे, असे म्हणत महिलेने त्यास मांजरसुंबा येथे बोलवले. आपल्याकडे वाहन नाही आणि सोबतही कोणी नाही, त्यामुळे मला पाटोदापर्यंत सोडा अशी विनवणी महिलेने केली. त्यानुसार हा तरुण विटभट्टीचालक पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेला. या ठिकाणाहून पुन्हा महिलेने विनवणी केली. 

मला आता माझ्या आष्टी गावी सोडा, असे म्हटले, त्यानुसार तो त्या महिलेला सोडण्यासाठी आष्टीला गेला. घरी गेल्यानंतर महिलेने चहापाण्याचा आग्रह केल्यानंतर नितीन बारगजे याने चहा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्यास एका रुममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केली. 

तीच्या साथीदाराने या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले. १५ लाख रुपये दे अन्यथा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर दहा लाख रुपये देण्याची तयारी या विटभट्टी चालकाने दिली. त्यानंतर त्या महिलेने पैसे घेण्यासाठी या विटभट्टी चालकासोबत दुचाकीवरुन एकास केजला एकास पाठविले. आपल्या मित्र परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसने मागितले. अचानक दहा लाख रुपये कशाला हवेत? असा प्रश्‍न काही मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय त्यांना आला. 

त्यानंतर या विटभट्टी चालक व मित्रांनीच उलट सापळा रचला. सोबत आलेल्या व्यक्तीस विश्वासात घेत ‘तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडिओ क्लिप डिलिट करून प्रश्‍न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू’, असे म्हटल्यानंतर संबंधिताने आपले साथीदार केजमध्ये बोलवून घेतले. तिघे जण स्कॉर्पिओमध्ये आले. या घटनेची माहिती केज पोलिसांना तत्पूर्वीच देण्यात आली होती.

त्यानुसार नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या शेखर पाठक यास पोलिसांनी अटक केली. अन्य आरोपी मात्र फरार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी राहूल धस, नेकनूर पोलिस ठाण्याचे एल.व्ही. केंद्रे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्याकडे सोपविला आहे.

Edited by pratap awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.