बीड : नुकत्याच एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे तारांबळ उडालेल्या प्रवाशांना आता पुन्हा एकदा एसटीकडे डोळे लावून वाट बघण्याची वेळ आलेली आहे. गणेशोत्सवासाठी बीड विभागाच्या २४५ बस या मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वच आगारातील फेऱ्या मोठ्या प्रमाणातील रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मात्र बसस्थानकावर ताटकळत बसण्याची वेळ आली.