Stormy Winds : बीड जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा पुन्हा तडाखा; कारचे नुकसान, घरांवरील पत्रे उडाले

अंबाजोगाई तालुक्यातील पुस व गिरवली शिवारात दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी चारच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
Stormy Winds hit
Stormy Winds hitsakal
Updated on

घाटनांदूर - अंबाजोगाई तालुक्यातील पुस व गिरवली शिवारात दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी चारच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुस येथील सिमेंट काँक्रिटची प्रवेशद्वाराची कमान कोसळून कारचा चक्काचूर झाला. परिसरात काही घरांवरचे पत्रे उडाले. वीजखांब कोसळल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जपलेला चारा भिजला आहे.

या भागात शनिवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही घरांवरील व शेतातील शेडवरील पत्रे उडाले. त्यांची जमवाजमव सुरू असताना आजही तसाच प्रकार घडला. वादळामुळे गिरवली येथील काहींच्या घरांवरील पत्रे उडाले. पत्रे उडाल्याने श्रावण गायकवाड व एका महिलेच्या घरातील साहित्य पावसाने भिजले. त्यात त्यांचे नुकसान झाले.

पुस येथे नंदागौळ मार्गावर पंधरा वर्षांपूर्वी उभारलेली सिमेंट काँक्रिटची कमान वादळी वाऱ्यामुळे कोसळली. या कमानीजवळ कार (टीएस ८ एचएम ०२०९) उभी करून मालक चहा पिण्यासाठी गेले होते. कमान कारवर कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

धारूर तालुक्यातील काही गावांना फटका

किल्लेधारूर - तालुक्यातील काही भागांत रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोनीमोहा, जहागीर मोहा, चोरांबा, घागरवाडा ही गावे व परिसराला मोठा फटका बसला. झाडे उन्मळली असून काही घरांवरील पत्रे उडाले. तालुक्यात गत पंधरा दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे. वादळी वाऱ्यामुळे खरीप पूर्व मशागतीची कामे करणाऱ्या मजुरांना फटका बसत आहे.

आज दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोनीमोहा, थेटेगव्हाण, आंबेवडगाव, जहागीरमोहा, चोरांबा परिसरात नुकसान झाले. घागरवाडा येथील अशोक महादेव नागरगोजे यांच्या घरावर वीज पडल्याने गृहोपयोगी साहित्य जळाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.