Latest Jatevade News: जातेगाव(जि.बीड) लहान भावाला मेंदूचा आजार असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.सोमवारी मोठा भाऊ त्यास भेटण्यास गेला असता लहान भावाचे आजारात होत असलेले हाल सहन न झाल्याने मोठ्या भावाचा हृदयविकाराने आज पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेखर भाऊसाहेब मोटे वय ३८ रा.गेवराई जि.बीड असे मृत झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.त्याचा लहान भाऊ शाम मोटे मेंदूचा आजार असल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सोमवारी मोठा भाऊ शेखर छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता.दरम्यान, सोमवारी लहान भावाचे आजारात होणारे हाल सहन झाले नसल्याने मंगळवार आज गेवराई येथे पहाटे मोठ्या भावाचाच हृदयविकाराने मृत्यू झाला.
कुटुंबीयातील सर्वात मोठा आणि कर्ता पुरुष गेल्याने मोटे कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मृत शेखर मोटे याच्या पाश्चात्य आई-वडिल, पत्नी,एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार असून, त्याच्यावर दुपारी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.शेखर याच्या आकस्मित मृत्यूने गेवराईत हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.