Beed : बनावट दुधाचा पर्दाफाश ब्रह्मगाव, हाजीपूरच्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई २७९४ लिटर दूध नष्ट

ब्रह्मगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत संत वामनभाऊ दूध संकलन व शीतकरण केंद्रात विनापरवाना दूध संकलन केले जात होते.
beed
beedsakal
Updated on

आष्टी, -दूधभेसळ विरोधी समिती व अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील हाजीपूर व ब्रह्मगाव येथील एकूण पाच दूध संकलन केंद्रांवर कारवाई करत तीन केंद्रांमधील दोन हजार ७९४ लिटर दूध नष्ट केले. यामुळे केंद्रांवर सुरू असलेल्या बनावट दुधाचा पर्दाफाश झाला आहे. कारवाईत सहा संशयास्पद नमुने पथकाने तपासणीसाठी हस्तगत केले आहेत.

सोमवारी (ता. ११) सकाळी पथकाने तालुक्यातील ब्रह्मगाव व हाजीपूर या दोन गावांतील दूध संकलन केंद्रांवर अचानक जाऊन तपासणी सुरू केली. या तपासणीत हाजीपूर येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रातील ८ हजार ५१४ रुपये किमतीचे २५८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तर,

beed
Beed News : नवे बीड ‘अस्वच्छ अन् बकाल’ मोकाट जनावरांसोबत आता कुत्र्यांचाही मुक्त संचार नगरपरिषदेचा ‘ढिसाळ’ कारभार

ब्रह्मगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत संत वामनभाऊ दूध संकलन व शीतकरण केंद्रात विनापरवाना दूध संकलन केले जात होते. तेथून ६१ हजार १३२ रुपये किमतीचे १ हजार ७९८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. येथीलच जय हनुमान दूध संकलन व शीतकरण केंद्रातून २५ हजार रुपये किमतीचे ७३८ लिटर दूध नष्ट केले. तिन्ही ठिकाणाहून तपासणीसाठी प्रत्येकी दोन नमुने हस्तगत करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी

beed
Beed News : श्रद्धेला मोल नाही; नारायणगडासाठी चार गावांतून ७२ लाख देणगी

संदीप देवरे, नमुना सहायक उमेश कांबळे, मुक्तार शेख, जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी झुंबरराव सोनवणे, श्री. मोराळे, आर. आर. गरड, श्री. चव्हाण, दुग्ध रसायन तंत्रज्ज्ञ पी. बी. भोसले, वैध मापनशास्त्र विभागाचे श्री. वनवे आदींचा कारवाईत सहभाग होता.

beed
Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

आन दि स्पॉट तपासणी

अत्याधुनिक किटद्वारे आता भेसळयुक्त दुधाची आॅन दि स्पाॅट तपासणी होते. मोहिमेदरम्यान समितीचे सदस्य व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जागेवरच विशेष किटद्वारे दुधाची तपासणी करतात. दुधात भेसळ आढळून आल्यास दूध जागेवरच नष्ट करण्यात येते. या किटद्वारे दुधातील युरिया, स्टार्च, शुगर, सॉल्ट, आणि दूध पावडरचे प्रमाण तपासले जाते. प्रमाणापेक्षा जास्त भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करून खटले दाखल करण्यात येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()