Beed : मनोज जरांगे पाटील यांच्या मातृभुमीत आज घराघरात दिवाळी साजरी

गुलालाची उधळन करत फटाक्याची आतिष बाजी
Beed
Beed esakal
Updated on

शिरूरकासार : मराठा समाजास आरक्षण मिळाल्याचा आनंद महाराष्ट्र भर होत आसुन आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मातृभुमीत घरा घरात आज दिवाळी साजरी करण्यात आली आहे. गल्ली बोळात डिजेच्या तालात बेधुंद होऊन लहान थोर महिलांसह गुलालाची उधळन करत फटाक्याची आतिष बाजी पहाटे पासुन सुरु आहे. दिवस भर गावात मराठा समाज बांधव पेडे आप्तेष्टांना भरवत आपला आनंद साजरा करत आहेत

Beed
Stock Tips: शेअर बाजाराच्या घसरणीत 'हे' 3 शेअर्स देतील चांगला परतावा, तज्ज्ञांना विश्वास

मराठा समाजास सरसकट आरक्षण देण्यात यावे या साठी सात महिन्यापासुन आंतरवली सराटी मनोज जरांगे पाटील यांनी कर्मभुमीतून संघर्ष सुरू केला होता.अनेक उपोषण, आंदोलन, मोर्चे,सभाग रॅली काढून सरकारला धारेवर धरत संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांंसाठी संघर्ष केला. आखेर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाग पाडले.

Beed
Blouse Styling Tips : बॅकलेस ब्लाऊजला स्टायलिश लूक द्यायचाय? मग या सोप्या टिप्स फॉलो करा

त्याची बातमी त्यांच्या मातृभुमित धडकल्यानंतर पहाटे पासुन गावात दिवाळी साजरी होऊ लागली आहे. दिवाळीची पहीले अभंग स्नानाला सुरूवात होऊन खरी दिवाळी साजरी करण्यात येत आहे. गावामधे सर्व मंदीरात देवदेवतांना पुष्पहार अर्पण करून तोरणे बांधून घरा समोर रांगोळ्या काढून आनंद उत्सवाला सुरूवात करण्यात आली आहे.

Beed
Blouse Styling Tips : बॅकलेस ब्लाऊजला स्टायलिश लूक द्यायचाय? मग या सोप्या टिप्स फॉलो करा

सकाळपासून गावामधे टाळ मृदंग ,भगवे पताका, घेऊन गावातील लहान थोर मंडळींनी दिंडी काढली आली होती. तसेच डिजे ढोल ताशाच्या तालावर गुलाल उधळून बेधुंद होऊन नाचत होते.सकाळ पासून मनोज जरांगे पाटील यांच्या घरी समाज बांधवाने गर्दी केली होती.संपुर्ण गावात समाज बांधवाने ५ किंटल पेढे, लाडू वाटून गावात आनंद साजरा करण्यात केला

Beed
Parenting Tips : मुलांचा सतत मूड बदलतोय? मग, 'या' पद्धतीने करा हॅंडल

माझ्या मुलाने चाळीस वर्षापासुन मराठा समाजास आरक्षणा संदर्भात लढा उभा केला आहे.त्यासाठी त्याने सात महीन्या पासुन घराचा दार पहीले नाही.

- प्रभावती रावसाहेब जरांगे पाटील ( आई)

आमच्या मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील पाच कोटी समाज बांधवाच्या आरक्षणासाठी जो संघर्ष त्याग केला त्याचा आमच्या मातोरी गावाला आभिमान आहे.

- रविंद्र जरांगे माजी सभापती पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.