Beed : तरुण, मुली आणि वंचितांचा मतदानातील टक्का वाढविणार

निवडणूक विभागाची मोहीम जिल्ह्यातील १०० महाविद्यालयांत उद्या नोंदणी अभियान
India Voting
India Votingsakal
Updated on

बीड - निवडणुकीची चाहूल लागल्याने पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांच्या नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी (ता. २१) एकाच दिवशी जिल्ह्यातील १०० मोठ्या महाविद्यालयांत मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मतदार यादीत महिलांच्या मतांची टक्केवारी तुलनेने कमी आहे. तसेच वंचित घटकांचेही मतदान कमी आहे. त्यामुळे या घटकांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदान नोंदविण्याच्या प्रक्रियेत अनेक नवतरुण कंटाळा करतात. तसेच इतर तांत्रिक कारणांनीही मतदार यादीत नाव नोंदविण्याचे राहून जाते.

त्यामुळे आता असे नवमतदार आढळणारे पॉकेट असलेल्या महाविद्यालयांवरच निवडणूक विभागाने फोकस केले आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आदी प्रमुख घटकांचा या मोहिमेत सहभाग असेल. त्याच बरोबर महाविद्यालय प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे. महाविद्यालयांतच तरुणांची मतदार नोंदणी करून घेतली जाणार आहे. तृतीयपंथीयांची देखील संख्या मोठी असताना मतदार यादीतील नोंदणी नगण्य आहे. पालावरील, झोपडीवरील कामगार व वंचित घटक तसेच दिव्यांगांचा टक्का वाढविण्यासाठी देखील या मोहिमेत लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.

India Voting
Sambhaji Nagar Cabinet: दीड हजारांची थाळी ते फाईव्हस्टार हॉटेलात मुक्काम; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर

विशेष म्हणजे मतदार यादीच्या वाचनासाठी प्रथमच विशेष ग्रामसभा देखील होणार आहे. ता. १६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ही सभा होईल. या मोहिमेत जिल्हा शल्यचिकित्सक व समाज कल्याण अधिकारी कार्यालयालाही सामावून घेतले जाणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाचे हे अभियान ता. ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मतदार नोंदणी अभियानाची तयारी पूर्ण झाली आहे. तरुण, मुलींसह वंचित घटक, दिव्यांग व तृतीयपंथीयांची अधिकाधिक नोंदणी करण्यात येणार आहे. महाविद्यालयांत जाऊन नोंदणीमुळे अधिक नोंदणी होईल. - शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बीड.

India Voting
Beed News : महिन्यापासून पावसाची ओढ; सोयाबीन, कपाशीचा खराटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.